चौकशीला घाबरून राणे यांनी लोटांगण घातलं - विनायक राऊत
(सुशांत सावंत)
मुंबई - राणे यांनी ईडी चौकशीला घाबरून भाजपसमोर लोटांगण घातल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज केला. नितेश राणे यांनी देखील किरीट सोमय्या आणि लोढा यांच्यावर टीका केली होती, असे विनायक राऊत म्हणाले. या नितेश राणे यांनी आरएसएसची हाफ चड्डीवाले असा उल्लेख केला होता, आम्ही सर्व शिवसेना खासदार किरीट सोमय्या यांनी राणेंवर जे आरोप केले त्याची चौकशी झाली का हे ईडी कार्यालयात जाऊन विचारणार, असेही राऊत म्हणाले. (सविस्तर वृत्त काही वेळात)
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात
(रश्मी पुराणिक)
विधान सभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. अध्यक्ष पद निवडणूकी बाबत राज्यपालांना कळवण्यात येणार त्यानुसार निवडणुकीची तारीख ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या कामांच्या ACB चौकशीची राष्ट्रवादी करणार मागणी
(अश्विनी जाधव- केदारी)
पुणे : पुणे महापालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. अनेक प्रकल्पात संशयास्पद हालचाली आहेत, हॉस्पिटलचा हजार कोटीचा प्रस्ताव आहे त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्प पीपीपी रस्ते याची चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असे जगताप यांनी सांगितले आहे.
ईडीवाले बिडी प्यायला लावतील - राऊतांना राणेंचा टोला
(सुशांत सावंत)
मुंबई : "शिवसेना भवन बांधताना राऊत कुठे होते. सेना भावनासाठी पाच पैसे देखील दिले का? काल मफलर इकडून तिकडे करत होते आणि त्याच मफलरने घाम पुसत होते.काल त्यांनी आरोप केला त्याला पुरावे नाहीत. जर आमच्या जास्त मागे लागलात तर आम्ही सर्व पुरावे देऊ मग पळता भुई थोडी होईल," असे सांगत ईडीच्या मागे लागलात तर बिडी प्यायला लावतील, असा बोचरा टोला नारायण राणे यांनी संजय राऊत यांना उद्देशून पत्रकार परिषदेत लगावला आहे.
राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर- नारायण राणे
(सुशांत सावंत)
मुंबई : "ईडीच्या अधिकाऱ्याला 300 कोटी घेतले राऊत म्हणतात. काय आहेत पुरावे त्यांच्याकडे? ईडीच्या अधिकाऱ्यांनी असे गप्प बसू नये. राऊतांना घेऊन जावे." असे म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदतील वक्तव्याबाबत टीका केली. संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे आहे. राऊत अर्धे नाही तर पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत, असेही राणे म्हणालेत.
राऊतांच्या पत्रकारीतेवर नारायण राणेंचे प्रश्नचिन्ह
(सुशांत सावंत)
मुंबई : ''लोकप्रभात असताना याने पराक्रम केले. त्याने त्यावेळी बाळासाहेब यांच्या विरोधात अनेक मूलाखती लिहिल्या. माझ्याकडे लोकप्रभाचे सर्व अंक आहेत. साहेबांनी हा पत्रकार कसा आहे हे सांगितले ते मी आज इथे बोलू शकत नाही. हा पत्रकार कशी अंतर्गत आग लावता येईल असे साहेबांनी याला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तुम्ही लाचार पत्रकार असे साहेबांचे वाक्य होते'' असे म्हणत नारायण राणे यांनी सध्या सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
(सुशांत सावंत)
मुंबई : ''मर्द माणसाला आपण मर्द आहोत सांगायची आवश्यकता नाही. अनेकदा सांगतो मी घाबरत नाही. पण तुला विचारतो कोण? जाहिरात काय केली राज्य भरातील शिवसैनिक,मंत्री येणार म्हणाले. पण साधा विभाग प्रमुख देखील नव्हता'' असे म्हणत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली आहे.
नाशकातील पुष्पाचं थेट पोलिसांना आव्हान
(अभिजित सोनवणे)
- शहरात 2 दिवसांत 2 वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची चोरी - मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक प्रमाेद वाघ यांच्या शासकीय निवासस्थानातून 5 चंदनाच्या झाडांची चोरी - तर आज नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या शासकीय निवासस्थानातून चंदनाची झाडं चोरली - अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानीचं चोरी झाल्यानं खळबळ
राणा कपूर यांना जामीन
(सूरज सावंत)
मुंबई : मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना जामीन मंजूर केला आहे. येस बँकेच्या 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. या प्रकरणात ईडीने राणा कपूर यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती ही जप्त केली आहे.
१८ फेब्रुवारीला कोर्लईला जाणार - सोमय्या
(सुशांत सावंत)
18 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या "19 बंगल्या" च्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी मी गाव कोर्लई, ता. अलिबाग आणि रेवदंडा पोलीस स्टेशनला भेट देणार असे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बंगल्यांच्या मुद्द्यावरुन किरीट सोमय्यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंब आणि कै. अन्वय नाईक यांनी 1 एप्रिल 2009 ते मार्च 2021 या कालावधीत 19 बंगल्यांवर मालमत्ता कर, वीज कर, आरोग्य कर भरले आहे शेवटचे पेमेंट 12 नोव्हेंबर 2020 रोजी केले.मग काय झालं या बंगल्यांचे!!?? चोरी हो गये !!??- असा सवाल सोमय्यांनी विचारला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.