देशातील पाच राज्यांचा सर्वात मोठा Exit Poll एका क्लिकवरती...

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून
Congress VS BJP
Congress VS BJPSaam TV
Published On

मणिपूरमध्ये काटे की टक्कर तर उत्तराखंडमध्ये भाजपाला बहूमत

मणिपूरमध्ये भाजपाला स्पष्ट बहूमत मिळताना दिसत आहे. तर उत्तरांचलमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

पंजाबच्या मनातला मुख्यमंत्री कोण?

पंजाबमध्ये दलित मतदान मोठ्या प्रमाणात आहे. मुख्यमंत्री पदासाठी पंजाबच्या जनतेने चरणजित सिंग चन्नी यांना सर्वाधीक पसंती दिली आहे. त्याचबरोबर आपच्या भगवंत मान यांनाही २५ टक्के जनतेने पसंती दिली आहे. भाजपाच्या सर्वच नेत्यांचा सुपडा साप झाल्याचा पाहायला मिळाला आहे.

पंजाबमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला पसंती

पंजाबमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला पसंती देण्यात आली आहे. काँग्रेसला पंजाबमध्ये ६० ते ६५ जागा मिळणार आहेत. आपला २३ ते ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल अशी परिस्थीती आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाला १०० जागांचा फटका...

2017 मध्ये युपीमध्ये भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा होत्या. आताच्या सामच्या सर्वेनुसार भाजपला मोठा फटका युपीमध्ये बसणार आहे. २०० ते २०१६ जागांवर भाजप असल्याचं पाहायला मिळत आहे. युपीमध्ये राम मंदीराचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

गोवेकरांच्या मनातील मुख्यमंत्री कोण?

गोव्याची यंदाची निवडणूक ही चर्चेचा विषय ठरली होती. कारण देशातील मोठे नेते गोव्यामध्ये तळ ठोकून होते. भाजपने मागचे १० वर्ष गोव्यात स्थीर सरकार दिले आहे. गोव्यात पुन्हा एकदा कोणाालाच बहूमत मिळालेले नाहीये. त्रिशंकू परिस्थीती निर्माण झाली आहे. गोव्याच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांना पसंती दिली आहे.

गोवा प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे

गोव्यात कोणालाच बहूमत नाही...

उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दे

देशाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे. देशातील सत्तेची सेमिफायनल म्हणून या निवडणूक निकालाकडे पाहिले जात आहे. शेतकरी आंदोलन, रोजगार, कोरोना काळातील काम हे सर्व मुद्दे समोर ठेवून उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. त्याचे योग्य उत्तर येत्या १० मार्चला समजेल. पंरतु सामच्या सर्वेमध्ये भाजपला सर्वाधीक जागा तर आखिलेश यादव यांच्या नावाला सर्वाधीक पसंती दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आखिलेश यादव यांना सर्वाधीक मतदान

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. १० तारखेला मतमोजणी होणार आहे. याच धर्तीवर साम टीव्हीने सर्वे केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आखिलेश यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

पुणे महापालिकेतील महापौर कार्यालयावर शाईफेक

पुणे महापालिकेत राडा

पुणे महानगर पालिकेत शाई फेक

पालिकेतील महापौर कार्यालयावर फेकली काळी शाई

भाजप नगरसेवकांकडून महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गोंधळ

(सुमित सावंत)

मुंबई महापालिका मुदत संपत असताना शेवटच्या दिवशीसुद्धा भाजप नगरसेवकांकडून महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गोंधळ

कुठल्या प्रकारची चर्चा न करता शेवटच्या दिवशी प्रस्ताव मंजूर केल्याने सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचा भाजप नगरसेवक यांचा आरोप

मुंबई महापालिकेची आज मुदत संपताना आज शेवटची स्थायी समितीची बैठक थोड्या वेळापूर्वीपार पडली

यामुळे जवळपास 360 प्रस्ताव मांडण्यात आले त्यातील बहुतांश प्रस्ताव हे मंजूर करण्यात आले

भाजप नगरसेवकांकडून उद्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करत असताना हरकतीचा मुद्दा मांडण्यात आला

मात्र भाजप नगरसेवकांकडून कुठल्याच प्रकारे ऐकण्यास न आल्याने भाजप नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ घालायला सुरुवात केली

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू झाली

कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे सर्व प्रस्ताव मंजूर करून तीनशे सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचं भाजपचे म्हणणे आहे

याविरोधात भाजपकडून मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालय बाहेरसुद्धा फलक घेऊन आंदोलन केले जाताय

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता

ब्रेक

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसां सोबत कदम हे शिवीगाळ करतानाची व्हिडिओ झाली होती व्हायरल

सदर प्रकरण मध्ये रमेश कदम यांच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गुन्हा

ह्यावर , पोलिसांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली होती आणि 25 हजारांची लाच मागितल्याचा कदमांनी तेव्हा केला होता आरोप

अण्णाभाऊ साठे महामंडळ मध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरनात रमेश कदम सध्या आहेत तुरुंगात

ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी

विधानसभेत ओबीसी विधेयक मंजूर

मध्य प्रदेशच्या धर्तीवर हे विधेयक मांडण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाचे काही अधिकार आता राज्य सरकारला मिळणार

प्रभागरचन, आरक्षण ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारकडे

राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ आता निवडणुका घेण्याचे अधिकार

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या जाणार आहेत.

नाशिकच्या सातपूर परिसरात भरदिवसा दरोडा

(अभिजीत सोनावणे)

- सकाळी ११ वाजता घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवून एक ते दीड किलो सोने आणि रोख रक्कम पळवली

- नाशिक मधील प्रसिद्ध उदोजक बाबुशेठ नागरगोजे यांच्या बंगल्यावर दरोडा

- घरातील महिला आणि लहान मुलांचा हात पाय बांधून चाकूच धाक दाखवत टाकला दरोडा

- घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि डॉग स्कॉड दाखल

२१ मार्च पर्यंत नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी..

(रश्मी पुराणिक)

मंत्री नवाब मलीक याना मुंबईतील विशेष पी एम एल ए न्यायालयात हजर करण्यात आले ..

- ईडीने पुढील कोठडीची मागणी केलेली नाही.

- मलिकच्या कोठडीत १३ दिवस पूर्ण झाले आहेत.

- ईडीकडून न्यायालयीन कोठडीची मागणी

- जेलमध्ये घरचे जेवण आणि औषध मिळावे यासाठी नवाब मलीक यांचा तर्फे कोर्टात मागणी....

- मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड एसपींना रजेवर पाठवणार

(रश्मी पुराणिक)

बीड कायदा सुव्यवस्था प्रश्नावर आमदारांनी प्रश्न उपस्थित केले

त्यावर गृहमंत्री घोषणा

कारवाईच्या भीतीने प्रसाद लाड यांची मुंबई हायकोर्टात धाव

(सुरज सावंत)

कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणात कारवाईच्या भीतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांची मुंबई हायकोर्टात धाव. पोलीस कारवाईची भीती असल्याने संरक्षण मिळावे, याचिकेद्वारे विनंती.

एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणाखाली पाच वर्षांपूर्वी तक्रार दाखल झाली होती आणि ते प्रकरण संपलेही होते. आता पुन्हा ते उकरून काढून माझ्याविरुद्ध कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे, अशी भीती व्यक्त करत प्रसाद लाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

रवी राणा प्रकरणाची चौकशी करणार - दिलीप वळसे पाटील

रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा का दाखल करण्यात आला? याचा विचार त्यांनी करावा. याप्रकरणी कुठलीही कृती करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मी आदेश दिले नव्हते. एखाद्या शहरात परिस्थिती स्फोटक बनते त्यावेळी माहिती घेणं आमचं कर्तव्य आहे. याप्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांबाबत चर्चा करू, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

कुख्यात गुंड इलियाज बचकाना मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या हाती

(सुरज सावंत)

कुख्यात गुंड इलियाज बचकाना मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या हाती

कर्नाटकच्या होसुर येथून केली अटक

इलियाज विरोधात ३७ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यात हत्या, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांची नोंद आहे.

इलियाज यांच्या सांगणयावरून त्याच्या साथीदारांनी डाॅकयार्ड येथे एका व्यक्तिवर जिवघेणा हल्ला केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना यापूर्वीच अटक केली होती. मात्र इलियाजचा शोधसुरू होता

हे प्रकरण गुप्तवार्ता विभागाकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांन इलियाजला अटक केली

सध्या इलियाजचा ताबा भायखळा पोलिसांकडे देण्यात आलेला आहे

OBC आरक्षणासंदर्भात मोठी बातमी 

प्रभाग रचनेतील सर्व अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेणार

मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा आणणार

सर्वपक्षीय बैठकीत एकमताने निर्णय

मुंबै जिल्हा बँक कथित गैरव्यवहार, दरेकर-सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता

(सुशांत सावंत)

मुंबै जिल्हा बँक कथित गैरव्यवहार, दरेकर-सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता

मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक कथित गैरव्यवहार प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता

मुंबै जिल्हा बॅंकेच्या कार्यक्षेत्राबाहेर नियम डावलून 27 कोटी रूपयांचं कर्ज दिल्याचा आरोप

केवळ कागदोपत्री असणाऱ्या उद्योगांना 27 कोटी रूपयांचं कर्ज

मुंबै बॅंकेकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तत्कालीन अध्यक्ष प्रविण दरेकर आणि कर्ज घेणाऱ्या सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबै बॅंकेवरील सत्ता जाताच दरेकरांवर कारवाईचे संकेत

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

(सुशांत सावंत)

विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून विरोधी सरकार विरोधी घोषणा बाजी करत आहेत

नवाब मलिक यांना पाठीशी घालनाऱ्या आघाडी सरकार चां धिक्कार असो.

देशद्रोहयांना पाठीशी घालनाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो.

राजीनामा द्या नवाब मलिक राजीनामा द्या.

ठाकरे सरकार कोण आहे दाऊद चे दलाल आहे.

दाऊद के दलालो को जुटे मारो सा लो को.

इत्यादी घोषणाबाजी करत आहेत.

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू

(रश्मी पुराणिक)

मुंबई - आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन कायदा करणार आहे.या कायद्याला कॅबिनेट ने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे. याबरोबरच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. महविकास आघडी सरकारने नऊ मार्च रोजी निर्णय घेण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे त्याला राज्यपाल मंजुरी देणार का याकडे सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com