(सुशांत सावंत)
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर कोकण विभाग प्रमुख म्हणून धुरा देण्यात आली आहे
तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या खांद्यावर एम एम आर डी ए क्षेत्र प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे
तर प्रसाद लाड यांची रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
(रश्मी पुराणिक)
रश्मी शुक्ला पुणे शहर पोलिस आयुक्त असताना राजकीय लोकांचे फोन अनधिकृतपणे tap केले होते.
त्याचा राजकीय करण्याकरिता उपयोग झाला
या बाबत महाराष्ट्र प्रश्न उपस्थित होता
उच्च स्तरीय चौकशीत फोन टॅपिंग केल्याचे समोर आले
राज्याचे पोलिस महासंचालक कारवाई करायच्या सूचना दिल्या
दोषी असल्याने तक्रार दाखल केली
नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे त्यांचे फोन tap केले
हे ड्रग मध्ये आहेत अन्य काही कारण म्हणून फोन टॅपिंग केलं
वेगळी नाव देऊन फोन टॅप केले
नाना पटोले अमजद खान
बच्चू कडू, निजामुद्दीन बाबू शेख
संजय काकडे अभिजित नायर
आशिष देशमुख महेश साळुंके
या व्यक्ती पुण्यात अमली पदार्थ विकतात असे कारण सांगण्यात येत आहे.
(रश्मी पुराणिक)
लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टानं निकाली काढली
मात्र सध्याच्या स्थितीत तिथलं बांधकाम पाडण्याचे निर्देश देता येणार नाहीत - हायकोर्टात
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय - हायकोर्ट
या प्रकल्पासाठी कोणत्याही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत हे मान्य - हायकोर्ट
लवासासाठी कायद्यात नव्यानं केलेल्या तरतूदींना आव्हान देत एड. नानासाहेब जाधव यांनी दाखल केली होती याचिका
लवासा प्रकल्पाला विरोध करणा-या जनहित याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यावर गुन्हा दाखल.
भाजप शिष्टमंडळातर्फे करण्यात आली होती तक्रार.
काल झालेल्या आंदोलना दरम्यान अमृता फडणवीस यांच्यावर केली होती आक्षेपार्ह टिप्पणी.
वाशी पोलिस ठाण्यात भाजपा आमदार मंदा म्हात्रे तर माजी खासदार संजीव नाईक यांनी पोलिस उपायुक्तांकडे केली होती तक्रार.
वाशी पोलिस ठाण्यात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा केला दाखल.
कलम 509 अंतर्गत दाखल करण्यात आला गुन्हा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी मुंबईत मोठा धक्का.
(रश्मी पुराणिक)
- इचलकरंजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले साप
- महावितरण कडून दिवसा लाईट मिळावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत.
- महावितरणच्या अधिकार्यांच्या टेबलवर साफ सोडल्यामुळे महावितरण मध्ये तणावाची वातावरण.
(गोपाळ मोटघरे)
पुणे - पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त आणि सध्याच्या CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल. राज्यातील अनेक राजकीम महत्वाच्या लोकांचे फोन टॅपिंग करुन गोपनीय माहीती उघड केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल.
(रश्मी पुराणिक)
- आपण मराठ्यांची बाजू भक्कम का घेता?
- शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्वप्न पाहिले ते फक्त मराठ्यांना घेऊन नाही तर १८ पगड जाती ना घेऊन केलं
- नंतर शाहू महाराजांनी आरक्षण दिले बहुजन समजला ह्यात अनुसूचित जाती जमाती ओबीसी होते, मराठा होते.
- मी मराठा म्हणून नाही तर बहुजन समाज या सगळ्यांना एक छता खाली कस आणता येईल यासाठी पर्यंत करत आहे.
- सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे पर्याय उरला नाही आता जे काही होईल ते होईल उपोषण करू
- आरक्षण महत्वाचं, तेवढ सारथी महत्वाचं
- माझा लढा गरीब मराठ्यांसाठी आहे
- सरकारने दिलेलं अश्वासन पाळलं नाही
- कोपर्डी मुळे मोर्चे निघाले मात्र ऑन दोषींना फाशी झाली का ?
(अभिजित सोनवणे)
नाशिक - मराठा आरक्षणासाठी सुरु करीत असलेले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची संभाजीराजेंना छत्रपती यांना केली आहे. राज्यसरकार तुमचंचं, तुमच्या सर्व मागण्या मान्य करत आहे -कोरोनामुळे काही गोष्टीना विलंब होत आहे हे खरं असलं तरी लवकर सर्व प्रश्नावर तोडगा काढला जाईल, असे भुजबळ म्हणाले.
कोल्हापुरातील शिवाजी पुलावर मराठा कार्यकर्ते एकवटले. जोरदार घोषणाबाजी करत रस्ता अडवला वाहनांच्या दोन्ही बाजूस लांबच लांब रांगा. संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर
(अभिजित सोनवणे)
- छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला रसद पुरवण्यासाठी नाशिकहून मराठा बांधव मुंबईकडे
- संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून मराठा बांधव मुंबईकडे निघाले
- खासगी बसेस आणि गाड्यांच्या माध्यमातून मराठा बांधवांची मुंबईकडे कूच
(अश्निनी जाधव केदारी)
पुणे - पिंपरी चिंचवड मध्ये काम करताना सोपं जायचं, मी धडाधड निर्णय घेऊन टाकायचो पण पुण्यात मात्र अवघड आहे असं सांगत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना टोला लगावला आहे. पुणेकरांचा स्वभाव सगळीकडे माहितीये, काही करायचं म्हटलं की चर्चेला येत नाही थेट कोर्टात जातात, चर्चेतून खरा मार्ग निघू शकतो ना, असा चिमटाही त्यांनी काढला
(अश्विनी जाधव केदारी)
पुणे - आरोग्य विभाग गट क पेपर फोडणारा मुख्य एजंट सायबर पोलिसांनी केला अटक
- पेपर फोडणारा मुख्य एजंट गोपीचंद सानप अटकेत
- बुलढाणायातून केली सानपला अटक
- दोन महिन्यापासून सानप होता फरार
- जीवन सानप याचा भाऊ संजय सानप यास तपास पथकाने अटक केल्यानंतर गोपीचंद सानप हा झाला होता फरार
- पेपर फोडणाऱ्या टोळीतील जीवन सानप व गोपीचंद सानप हे दोन प्रमुख गट कार्यरत होते
- आज दुपारी गोपीचंद सानपला केले जाणार कोर्टात हजर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.