मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. कारण अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंवरती गुन्हा दाखल झाला होता मग त्यांचा राजीनामा घेतला का?. त्यामुळे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा नाही घेणार असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
मलिकांचा राजीनामा घेण्याची शक्यता; वर्षावर बैठक
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटकाच आहे. काही महिन्यांत महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत पोहोचला आहे. याआधी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती.
मंत्री अनिल देखमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रकारे राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांनाही आज ईडीने अटक केली आहे, त्यामुळे आता मंत्री नवाब मलिक सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार का याकडे लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आपल्या पक्षाचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेला निघणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
मलिकांच्या अटकेनंतर मॅरेथॉन बैठका
- सगळे मंत्री आता वर्षा वर जात आहेत.
- वर्षावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सुनील केदार उपस्थित असणार.
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री शरद पवार मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार.
"दाऊदच्या बहीणीनं नवाब मलिकांसोबत आर्थिक व्यवहार केला"
दाऊदची बहीण हसीना पारकर हिनं संबंधित कोट्यवधींच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या ५५ लाखांमध्ये केला. हा व्यवहार पूर्णपणे रोख करण्यात आला त्याचे कोणतेही बँक रेकॉर्ड ठेवण्यात आले नाहीत, असा दावा ईडीनं कोर्टासमोर केला आहे.
नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर आजची सुनावणी टळली...
(अरुण जोशी)
खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 29मार्चला...
आज सर्वोच्च न्यायालयात अमरावतीच्या खासदार नवणित राणा यांच्या जात वैधता संदर्भातील अंतीम सूनावणी होती..
आता 29 मार्चला होणार अंतीम सुनावणी...
नवाब मलिक मंत्री पदाचा राजीनामा देणे शक्य
(रश्मी पुराणिक)
ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या पक्षाचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेला निघणार आहेत.
नवाब मलिकांना ईडीकडून अटक
मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना 1 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आणि तिथे त्यांची तब्बल सात-आठ चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली (सविस्तर वृत्त काही वेळातच)
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा
(रश्मी पुराणिक)
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आज वळसे पाटील व मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट होण्याचीही शक्यता आहे.
गुंडाचा कारागृहात अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
(मंगेश मोहिते)
नागपूर : कुख्यात राजा गौस टोळीचा सदस्य असलेला गुंड शोएब सलीम खान यांने कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अचानक झालेल्या हल्यात हेमंत इंगोले जखमी झाले आहे. कारागृहातील कर्मचारी आणि अन्य कैद्यांच्या मदतीने शोएब सलीम खानला आवरण्यात आले
नवी मुंबई महापालिकेचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प सादर
4910 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर.
4908 कोटी खर्चाचा आणि 180 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर.
अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाला प्राधान्य.
सुप्रिया सुळे यांचा नवाब मलिकांच्या मुलीला फोन
(रश्मी पुराणिक)
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांच्या कन्येला फोन करून पक्ष आणि सर्व नेते पाठीशी असल्याचा विश्वास दिला. महाविकासआघाडी म्हणून सर्व नेते नवाब मलिक यांच्या पाठीशी, असून या कारवाईला उत्तर दिले जाईल असा तिला विश्वास सुळे यांनी दिला
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयावर जाणार
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. आम्ही येतोय..अडवून दाखवा असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिले आहे
टीईटी गैरव्यवहार प्रकरण - पेपर फोडण्याचे प्रशिक्षण बिहारमध्ये
(अश्विनी जाधव- केदारी)
पुणे - ऑनलाईन पेपर कसे फोडावे या बाबत बिहारमधील पाटणा येथे प्रशिक्षण घेतले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय, टीईटी गैरव्यवहार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे, या पेपरफुटी प्रकरणात विविध ठिकाणच्या एजंट ची साखळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे..सविस्तर वृत्त काही वेळात
मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात
मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी १ तास चौकशी केली. चौकशी केल्यानंतर ०७:३० वाजता नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.