TET Scam : टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा

विधीमंडळाच्या आजच्या कामकाजात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे.
Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis news saam tv

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधीमंडळ अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा आरोप झाल्याने वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या संंबंधिचे आरोप करत याबाबतीत सरकार कोणाला पाठीशी घालत आहे, असा सवालही विचारला होता. याच वादावर विधीमंडळाच्या आजच्या कामकाजात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Winter Session)

Devendra Fadnavis news
Akshay Kumar: केबीसीच्या सेटवर अक्षयने महिलांना दिला नवा कानमंत्र, सेल्फ डिफेन्ससाठी नवा पर्याय...

याबाबत अधिक माहिती अशी की,शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणात शिंंदे गटाचे आमदार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याने विरोधकांनी यावर जोरदार टिका केली होती. विरोधकांच्या याच आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवरच पलटवार केला आहे.

Devendra Fadnavis news
Ratan Tata Love Story: आपल्या कर्तुत्वाने जग जिंकणारा प्रेरणादायी उद्योजक प्रेमात मात्र अपयशी; अशी होती रतन टाटांची फिल्मी लवस्टोरी

याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, "ज्या कंपन्यांना अपात्र केले होते त्यांना पात्र करुन ही परिक्षा घेण्यात आली, तसे झाले नसते तर घोटाळा घडलाच नसता, हा सगळा घोटाळा मंत्रालय स्तरावर घडला असून, निश्चितपणे अपात्र लोकांना पात्र करून घोटाळा कोणी केला याची उच्चस्तरीय चौकशी करुन दोशींवर कडक कारवाई केली जाईल," अशी घोषणा यावेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com