१६५ आमदारांचं पाठबळ असताना मंत्रिमंडळ विस्तार का रखडला ? अजित पवार म्हणाले....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं सुरु आहेत.
ajit pawar, eknath shinde, maharashtra politics
ajit pawar, eknath shinde, maharashtra politicssaam tv
Published On

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Government) स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यात खलबतं सुरु आहेत. मात्र विरोधी पक्षांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकांचं सत्र सुरुच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही नवनिर्वाचित राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. १६५ आमदार पाठबळ असताना मंत्रिमंडळ विस्तार का रखडला आहे, हे कळलं पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांचीच कॅबिनेट चाललेली आहे. राज्याचा कारभार गतीने होण्याकरिता काम केलं पाहिजे. आता सगळा भार जनतेवर आहे, असं म्हणत पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

ajit pawar, eknath shinde, maharashtra politics
EMM Negative : दुर्मिळ रक्तगट असणारा देशातला पहिला व्यक्ती गुजरातमध्ये आढळला

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्या राज्यात पाऊस सुरू आहे. धरणाची परस्थिती चांगली आहे. तीन जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला आहे. खडकवासला भरलं आहे.शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. सरकारकडून भरीव मदत करण्याची वेळ आलेली आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांबाबत निवडून आल्यावर अडचणी येतात.मानसन्मान मिळत नाही.नगराध्यक्ष एकटे पडतात. हा निर्णय लोकशाहीला मारक आहे.

पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. यावेळी ते म्हणाले, या दोघांच्या मनात आलं म्हणून परत निर्णय घेतला. पेट्रोल डिझेलला राज्य सरकार जो टॅक्स लावत आहे, त्यात जाऊन टॅक्स कमी केला असता तर अजून किमती कमी झाल्या असत्या. विरोधीपक्षात असताना वेगळी भूमिका आणि सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका. मार्केट कमिटी निवडणूकांत त्याला आमदारकीचा स्वरूप येईल. याबाबत आम्ही अधिवेशनात योग्य भूमिका मांडू.पेट्रोल डिझेल खूप तूटपुंजी कमी केले आहेत. मदत पुनर्वसन महत्वाच खातं असत. अनेक वेळा पावसाळ्यात खूप महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे सचिव असणं गरजेचं असतं. हे दोघेच आता महाराष्ट्राचे मालक आहेत.

ajit pawar, eknath shinde, maharashtra politics
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

१६५ आमदारांचं पाठबळ असताना मंत्रिमंडळ विस्तार का रखडला आहे, हे कळलं पाहिजे, असंही पवार म्हणाले. तसंच पवार पुढे बोलताना म्हणाले, राज्याचा कारभार गतीने होण्याकरिता काम केलं पाहिजे. अडीच वर्षे कधी पाहिलं की मुख्यमंत्र्यांचा माईक काढला नाही. पण अस करायचं नसतं,नाव घेताना मुख्यमंत्री यांनी कोल्हापूर मध्ये सगळ्यांची नावे घेतली,पण भाजपमधील नेत्याचं नाव घेतलं, असं करायचं नसतं.

अलीकडे मीडियामधून सर्व गोष्टी बाहेर पडतात.राष्ट्रपतीपदाला पाठींबा देणं हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याआधीही त्यांनी असा पाठिंबा दिला आहे. दीपक केसरकर यांनी बोलताना अभ्यास केला पाहिजे. केसरकर दुसऱ्याच्या नावावर पावती फाडत आहेत.पवार साहेब यांच्यावर खोटा आरोप करत आहेत. माहिती घेऊन बोलावं. केसरकरांना माझा प्रेमाचा सल्ला आहे. मध्यावधी निवडणूका लागणार नाहीत. सुप्रीम कोर्टात ओबीसीबाबत निकाल आला नाही. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणूका पूढे ढकलल्या आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com