Ravikant Tupkar: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाचा उदय! विधानसभेच्या मैदानात एन्ट्री; रविकांत तुपकरांची मोठी घोषणा

Maharashtra Assembly Election 2024: बुलढाणा विधानसभा मिळण्याची प्रकर्षाने मागणी केली आहे. सकारात्मक निर्णय होत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण आपला निर्णय घेऊ.. असे रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
Ravikant Tupkar: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाचा उदय! विधानसभेच्या मैदानात एन्ट्री; रविकांत तुपकरांची मोठी घोषणा
Ravikant Tupkar Saam TV
Published On

संजय जाधव, बुलढाणा

Krantikari Shetkari Sanghatana: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामधून जाहीर मेळावा घेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत रविकांत तुपकर यांनी ही मोठी घोषणा केली असून आता ते कोणाला साथ देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या पक्ष स्थापनेनंतर राज्यात गनिमी काव्याने निवडणूक लढवावी लागेल, असे सूचक संकेतही रविकांत तुपकर यांनी दिले आहेत.

Ravikant Tupkar: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाचा उदय! विधानसभेच्या मैदानात एन्ट्री; रविकांत तुपकरांची मोठी घोषणा
Maharashtra Politics: मविआच्या नाराजीनाट्यावर पडदा! काँग्रेसचा 'हा' नेता वाद मिटवणार, शरद पवार- ठाकरेंशी चर्चा करणार

रविकांत तुपकरांची मोठी घोषणा

एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच रविकांत तुपकर यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. आपला प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिला आहे. यामध्ये बुलढाणा विधानसभा मिळण्याची प्रकर्षाने मागणी केली आहे. सकारात्मक निर्णय होत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण आपला निर्णय घेऊ.. असे रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

विधानसभेच्या मैदानात पाठिंबा कुणाला?

"आपली शेतकऱ्यांची वोट बँक राज्यातील 27 जिल्ह्यात आहे. त्यांचा निर्णय उद्यापर्यंत कळवा. ज्या जागा निवडणुन येणार असतील त्याचं जागा आपण लढविणार आहे.आम्हाला सन्मानाने सोबत घ्या, लाचारी करणार नाही. पहिला पर्याय महाविकास आघाडीचा, तिसरा पर्याय वंचितचा मग चौथा पर्याय स्वतंत्र राहील. मात्र महायुतीसोबत जायचे नाही. महाविकास आघाडी किंवा वंचित हे दोनच पर्याय आहेत. अन्यथा कोणाला पाडायचं व कोणाला निवडून आणायचं यावर लक्ष केंद्रित करु. गनिमी काव्याने ही निवडणूक लढवावी लागेल," असं रविकांत तुपकर म्हणालेत.

Ravikant Tupkar: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाचा उदय! विधानसभेच्या मैदानात एन्ट्री; रविकांत तुपकरांची मोठी घोषणा
Sanjay Raut: फक्त ५ कोटी दाखवले, १० कोटी झाडी- डोंगरात पोहोचले, राऊतांचे CM शिंदेंवर खळबळजनक आरोप!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com