
महाराष्ट्राच्या पर्यटनाला पुढे नेण्याच्या पर्वाची सुरुवात आज झाली आहे.
पर्यटन वाढीसाठी येथे २० ते २५ कोटीच काम झालं आहे.
अनमोल रत्नासारखा हा जिल्हा झळकतो
कोकण भूमी ही देवभूमी आहे
थिबा पॅलेस अनमोल ठेवा
बारामतीच्या इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नजीक पिकअपला अपघात झाला. कार आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय. दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी रत्नागिरीतील श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणात जात पाहिला थ्री डी शो
रत्नागिरीतील तारांगण हे राज्यातील पहिलं ऍक्टिव्ह थ्री डी तारांगण
नवीन पिढीला याची गरज अतिशय जरुरीची आहे - अजित पवार यांची प्रतिक्रिया
जालन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेला बॅनर फाडण्याचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी एका संशयित आरोपीला घेतलं ताब्यात
शिवाजीनगर भागात नागरिकांना पाणी वेळेवर भेटत नसल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक होत ठेवलं महाराजांच्या पुतळ्याजवळ निवेदन
राज्यात देशात भाजपचे सरकार असतानाही भाजप पदाधिकारी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक
वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वाशिमच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले
शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यता संदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पटसंख्येच्या कारणावरून गाव, तांडा आणि वस्तीतील अनेक शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
हा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा.आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे. या मागण्यांना घेऊन आज ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केलंय, यावेळी जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते.
तृप्ती देसाई यांनी आज मसाजोग गावात जाऊन धनंजय देशमुख कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली.
या भेटी दरम्यान आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती देसाई यांनी धनंजय देशमुख यांच्याकडून घेतली.
धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या आई, पत्नी आणि मुलीची भेट घेत इतर विषयांवर चर्चा केली.
या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करून देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा.. अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली.
खडकवासला चौपाटीजवळ पीएमटी बस जळून खाक; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
दुपारच्या वेळेस पीएमटीला लागली आग.
सर्व प्रवासी सुखरूप.
अग्निशामन दलाने विझवली आग.
आगीत पीएमपीएल बस खाक.
खोक्या विरोधात होणार मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण
सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी ग्रामस्थ आणि वन्यजीव प्रेमी बेमुदत उपोषण करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर हे उपोषण 20 मार्चपासून बेमुदत केले जाणार असून, त्याची परवानगी उपोषणकर्त्यांना मिळाली आहे.
जोपर्यंत या घटनेतील इतर आरोपी अटक होत नाही. संबंधित अधिकारी आणि व्यक्तींचा सीडीआर तपासला जात नाही. एसआयटी स्थापन होत नाही. तसेच खोक्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जात नाही. तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.
साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली. यामध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल 20 हजार रुपयांचा उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी ताब्यात घेतली. या बोली नंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी सातारासह परिसरातून मोठ्या संख्येने व्यापारी बाजार समिती परिसरात उपस्थित होते.
- सोलापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक, सोलापुरातील झेडपी कार्यालयासमोरील गेटवर मोर्चा काढत केलं ठिय्या आंदोलन
- अंगणवाडी सेविकांना दिलेली टीएचआर सिस्टीम रद्द करा, इतर कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांची कामाची वेळ करा आणि अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करा अशा मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा
- जिल्ह्यात सर्वेक्षण करत असताना टीएचआर सिस्टीम प्रणाली मध्ये अडचणी येत असल्याचीही अंगणवाडी सेविकांची तक्रार
- राज्य सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांची जोरदार घोषणाबाजी
जालन्यातील परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायत अंतर्गत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ग्रामस्थांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल आहे.
परतुर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये तब्बल 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून भ्रष्टाचार झालेल्या कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे.
दरम्यान आज अजित पवार गटाचे नेते सुरेशकुमार जेथलीया यांनी जिल्हा परिषद कार्यालय समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे . वेळ पडली तर या भ्रष्टाचाराची तक्रार आम्ही अजित पवारांकडे करू असा इशारा अजित पवार गटाचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांनी दिला आहे...
वाशिम नगरपालिकाद्वारे शहरातील नागरिकांना आठ दिवस आड पाणी पुरवठा होतो, त्यामुळं नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचं चित्र असतांना... दुसरीकडे पाणी फिल्टर प्लान्ट कडून पाण्याच्या टाक्यापर्यन्त जाणाऱ्या हिंगोली नाका परिसरात असलेल्या वाल्व्ह मधून,मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. खराब वाल्व्ह दुरुस्त करून नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू
प्रशांत कोरटकर चे वकील सौरभ घाग यांचा युक्तिवाद सुरू
सुनावणी दरम्यान असीम सरोदे यांचा युक्तिवाद होणार
खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राहाता येथील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने केली...यावेळी नगर - मनमाड महामार्गावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत औरंगजेबाच्या कबरीच्या फोटोवर हातोडा चालवत आपला रोष व्यक्त केला. सरकारने लवकरात लवकर कबर हटवावी अन्यथा हिंदुत्वादी संघटना कबर उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय.
- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबर विरोधात केलेल्या आंदोलन विरोधात मुस्लिम समाजाचे लोक झाले होते गोळा...
- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलनाच्या वेळी मुस्लिम समाजाचा धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
- महालच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात हे आंदोलन करण्यात आला होता
- तिथेच मुस्लिम समाजाचे अनेक जण मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन घोषणाबाजी केली
- मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांत करत परिसर मोकळा केला..
- बजरंग दलचं आंदोलन सुरु असताना औरंगजेबचा पुतळा जाळण्यात आला त्या पुतळ्याला हिरवी चादर होती.. हिरवी चादर असल्याने मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या त्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा झाले आहे..
छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कल्याणमध्ये देखावा
देखाव्यात भाजप नेते आणि मंत्र्यांचा देखील जाहीर निषेध
पोलिसांचा शिवजयंतीच्या देखाव्यावर अक्षेप..
देखाव्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा व खासदार त्रिवेदी यांचे कटआउट काढले..
पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील सफाळे रेल्वे स्थानकावर आज दुपारच्या सुमारास गुजरातकडे जाणाऱ्या कटरा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला.
याचा परिणाम डहाणूपर्यंतच्या उपनगरीय लोकल रेल्वेसह गुजरातकडे जाणाऱ्या एक्सप्रेसवर झाला होता .
डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय लोकल सह एक्सप्रेस तब्बल एक ते दीड तास उशिरा असून एक तासानंतर कटरा एक्सप्रेसच इंजिन बदलल्यानंतर एक्सप्रेस पुढे गुजरातकडे रवाना झाली.
मात्र या दरम्यान डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल आणि पश्चिम रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्या तब्बल एक ते दीड तास विविध रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आल्या होत्या.
त्यामुळे काही काळ डाउन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
पाटबंधारे विभागाच्या विरोधात उपोषणाला सुरुवात
हतनूर, वाघूर धरणाच्या दुरुस्तीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
कार्यकारी अभियंत्यांला निलंबित करा...निलंबित करा..च्या घोषणा
औरंगजेबाची कबर हटवा, मालेगावात विश्व हिंदू परिषद अन् बजरंग दल आक्रमक झाली आहे. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना छळ करून मारले, हिंदूचे देवदेवतांची मंदिरे तोडली, हिंदू महिलांवर अत्याचार करत अनन्वित छळ केला अशा क्रूरकर्मा औरंगजेबची कबर महाराष्ट्र सरकारने तातडीने हटवावी अशी मागणी नाशिकच्या मालेगाव येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या वतीने मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली.
पंढरपुरात बजरंग दलाचे आंदोलन
छत्रपती संभाजी नगर मधील औरंगजेबची कबर काढून टाकावी या मागणीसाठी आज येथील बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदारांना लेखी निवेदन दिले.
औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे... मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. बजरंग दलाचे जिल्हा महामंत्री गौतम रावरीया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून यावेळी बजरंग दलाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात येणार आहे
बीडच्या शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला अमानुष मारहाण प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सतीश भोसलेने आता अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला.. सतीश भोसले याच्या कुटुंबाला मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. याबरोबरच त्याच्या घराच्या साहित्याला देखील आग लावण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी. या मागणीसाठी सतीश भोसले हा पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी आंदोलन
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येतेय
महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी अन्यथा बजरंग स्वाभिमान हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावरून उतरून आंदोलन करेल मोर्चेत काढेल.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आज एकाच वेळी आंदोलन केलं जात आहे.
अंजुमन तब्लीगुल इस्लाम शाळेच्या गच्चीवर मोबाईल टॉवर होतं. या मोबाईल टॉवरला आग लागलीय. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अजित पवार गट राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी देण्यात आलीय. खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलीय. पण मागणीत घट झाल्याने दरात घसरण झालीय. अन्य राज्यातूनदेखील कांद्याची मागणी घटली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्कामुळे देखील निर्यात घटली आहे. मागील १५ दिवसांत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झालीय. १५ दिवसांपूर्वी सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल असणारे कांद्याचे दर १४५० रुपयांवर आलेत.
दोन महिन्यात लोणी काळभोर पोलिसांच्या 5 खटल्यात आरोपीला शिक्षा ठोठवलीय. घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमास सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोक्सो न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा. नवनाथ अशोक खराडे (वय २६, रा. उरुळी कांचन तुपे वस्ती, मुळ रा. भोगेवाडी, ता. म्हाडा, जि. सोलापूर) असे या नराधमाचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण आज (१७ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच विविध मंत्री, आमदार, खासदार आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा काढण्यात येणार आहे.
लालमहाल ते विधानभवन अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
बेरोजगारीच्या विरोधात युवा आक्रोश करण्यात येणार आहे. पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी नाकारलीय. मात्र युवक काँग्रेस पदाधिकारी पदयात्रा काढण्यावर ठाम आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे तिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने आजी माजी आमदारांनी शक्तीप्रदर्शन करत शिवजन्मोत्सव साजरा केलाय.. संगमनेर बस स्थानक परिसरात महायुतीचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी गड किल्ल्याचा भव्य देखावा उभा केलाय.. तर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचा देखावा साकारला आहे.
समृद्धी महामार्गावर बदनापूर तालुक्यातील सोमठाना गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास रायपूरहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने समोर चालत असणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. ट्रकचा वेग जास्त असल्याने धडक जबरदस्त होती, अपघातामुळे रोडवरती काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कव्हर हटवा अशी मोहीम सुरू केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी खुलताबाद येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कव्हर हटवा अशी मागणी केल्यानंतर त्या मोहिमेला आज सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आले होते. त्यामुळे आजही खुलताबाद येथील परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंत्री नितेश राणे,शिवभक्तांच्या उपस्थितीत पाच महिलांनी पाळणा गात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न केला यावेळी शिवनेरी गडावर मर्दाणी खेळाची प्रात्याक्षिक सादर करण्यात करण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीं व पोलिसांचे संबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केले होते.बीड पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळत तृप्ती देसाई यांना नोटीस देखील बजावली होती. आता याच नोटीसीला उत्तर देण्यासाठी तृप्ती देसाई या आज सकाळी 11.30 वाजता बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात येणार आहेत या ठिकाणी त्या त्यांच्याकडे असलेले असलेले पुरावे सादर करणार आहेत.आता या भेटीदरम्यान तृप्ती देसाई नेमके कोणते पुरावे सादर करणार आणि पोलिसांच्या नोटिसीला काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना मधमाशांचा हल्ला झालाय. वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.