Madhya Pradesh Rain: मध्य प्रदेशात पावसाचा हाहाकार, नर्मदा नदीला महापूर; महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची भिती?

Heavy Rain Fall In Madhya Pradesh: दक्षिण मध्य प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे.
Madhya Pradesh Rain
Madhya Pradesh RainSaamtv`
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी

Madhya Pradesh Rain Update:

दक्षिण मध्य प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. नर्मदा नदीला महापूर आल्याने इंदोरवरुन महाराष्ट्रात येणारा इंदूर बुऱ्हानपूर सोलापूर महामार्ग २४ तासांपासून बंद झाल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Madhya Pradesh Rain
Satara Accident News: साताऱ्यातील खंबाटकी घाटात भीषण अपघात; कंटनेरखाली चिरडून तरुण-तरुणी ठार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण मध्यप्रदेशात गेल्या 48 तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा आणि शिप्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्ग नर्मदा नदीत सोडल्यामुळे नर्मदा नदीला पूर आला आहे.

या पुरामुळे उज्जैन- इंदोर - बुऱ्हानपूर - सोलापूर महामार्ग गेल्या 24 तासापासून बंद आहे. मोरटक्का येथील नर्मदा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी असल्याने हा महामार्ग गेल्या 24 तासांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

विकेंड व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील काही पर्यटक मध्य प्रदेशात अडकले असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात अजूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती खांडव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ओंकारेश्वर आणि मोर टक्का परिसरात बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. नर्मदा आणि शिप्रा नदीला आलेल्या महापुरामुळे मध्य प्रदेशात हाहाकार उडला आहे. (Latest Marathi News)

Madhya Pradesh Rain
Bacchu Kadu: 'मला बदनामीची पर्वा नाही, गुवाहाटीत...'; 'खोके खोके' टीका करणाऱ्यांना बच्चू कडू यांचं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com