सांगली : सांगली (Sangali) जिल्ह्यातील एका बोकडाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अगदी पोपटाच्या चोचीसारखा चेहरा असणारा हा बोकड अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो आहे. माडग्याळ जातीचा हा बोकड जोपासण्याचा छंद विलास पाटील या तरुण शेतकऱ्याला जडला आहे. आटपाडी मध्ये कामगार मेळाव्यात मेळाव्यात त्यांनी हा राजा नामक बोकड आणला होता. यावेळी या बोकडला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. इतकंच नाही तर, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत या बोकडाचा सत्कारही करण्यात आला आहे.
आटपाडी येथे नुकताच कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विलास पाटील या शेतकऱ्याने एक माडग्याळ जातीचा बोकड आणला होता. मेळाव्यात सहभागी झालेल्या कामगारांसाठी हा बोकड चर्चेचा विषय ठरला. माडग्याळ जातीच्या या बोकडाचा चेहरा अगदी पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. विलास पाटील यांनी या बोकडाचं नाव राजा असं ठेवलं आहे.
अवघ्या 2 महिने 8 दिवसांचा या बकऱ्याला खरेदी करण्यासाठी 31 लाख रुपयांची ऑफर मिळाली असल्याचं विलास पाटील यांनी सांगितलं. माडग्याळ जातीची बोकडाची जात ही जगभरात प्रसिद्ध आहे. या बोकडाला लाखो रुपयांची किंमत मिळते. पोपटासारखी चोच असणारा हा बोकड दिसायला अतिशय सुंदर आणि देखणा असतो. आणि म्हणूनच त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. दरम्यान, 31 लाखांची बोली लागलेल्या या बोकडाचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोकडाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Edited By - Satish Da
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.