Lampi Virus in Parbhani: शेतकऱ्यांची चिंता वाढली; लम्पी आजाराने पुन्हा डोकं वर काढलं, जनावरांची काळजी कशी घ्याल?

लम्पी आजाराने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. परभणी जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा धोका पुन्हा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Lampi Virus in Parbhani/File photos
Lampi Virus in Parbhani/File photosSaam tv
Published On

Parbhani News: लम्पी आजाराने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. परभणी जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा धोका पुन्हा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परभणीतील पूर्णा, गंगाखेड, मानवत तालुक्यातील काही गावात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

परभणीत जनांवरामध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या डोक्याचं टेन्शन वाढलं आहे. जनांवरामध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी लसीकरणामुळे काहीसा कमी झालेल्या लम्पी त्वचारोगाने आता पुन्हा डोके वर काढले असल्याची स्थिती आहे. या रोगाचा वेगाने संसर्ग सुरू आहे.

Lampi Virus in Parbhani/File photos
Chhatrapati Sambhajinagar: तब्बल १७६ वर्षाची ऐतिहासिक परंपरा! गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाची गिनीज बुकात नोंद

परभणीत सध्या या रोगाची तीव्रता कमी असली तरी मोठया प्रमाणात जनावरांना या रोगाची लागण होत आहे. पूर्णाच्या तालुक्यातील गौर येथे लंपीने पूर्णा नवनाथ रुस्तूमराव चपेले यांची मोठी कालवड दगावली. मानवत तालुक्यातील गोगलगावात अनेक पशुपालकांच्या जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे.

Lampi Virus in Parbhani/File photos
Parbhani News: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको; गंगाखेड रोडवर वाहतूक खोळंबली

दरम्यान, परभणीत सुरेशराव मगर यांच्या मालकीच्या एका जनावराचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे शेतकरी ज्ञानोबा कदम, गंगाधर भोसले यांच्या मालकीच्या बैलांनाही लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

सध्या शेती मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. लम्पी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुसंवर्धन विभागाने लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

Lampi Virus in Parbhani/File photos
Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाने आता कधी, कुठे दिला पावसाचा अलर्ट?

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको

परभणीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज ब्राम्हणगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. जिल्हा प्रशासनास पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात ७० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com