हरवलेल्या मुलांना 'आधार' च्या माध्यमातून मिळाले कुटुंब

नागपुरात हरवलेल्या दोन मुलांची घरवापसी
हरवलेल्या मुलांना 'आधार' च्या माध्यमातून मिळाले कुटुंब
हरवलेल्या मुलांना 'आधार' च्या माध्यमातून मिळाले कुटुंबसंजय डाफ
Published On

नागपूर - आधार कार्डवर Adhar Card असलेल्या असलेल्या रेकॉर्डच्या Record माध्यमातून हरवलेल्या दोन मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचविणे शक्य झालं आहे. त्यामुळे आधार कार्ड प्रत्येकासाठी महत्वाचा ठरत आहे. नागपूरात Nagpur एका मुलाला दहा वर्षानंतर तर दुसऱ्याला दोन वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं.

अमन धनगरे हा दहा वर्षांपूर्वी नागपूर रेल्वे Nagpur Railyway स्थानकावर सापडला होता.त्याच्या घरच्यांचा पत्ता लागत नसल्याने त्याला बाल सुधार गृहात पाठविण्यात आले. त्यांनतर नागपुरातील दामले कुटुंबियांनी त्याला दत्तक घेऊन त्याचा 10 वर्षे सांभाळ केला.

हे देखील पहा -

तो दहावीत गेल्यावर त्याचं आधारकार्ड काढण्यासाठी त्याचे जुने आधार कार्ड असल्याचे पुढे आले. हाताची बोटं स्कॅन केल्यावर त्याची मूळ ओळख पटली. त्याचे मूळ नाव मोहम्मद आमिर असून तो मूळचा मध्य प्रदेशातील जबलपूर येथील असल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांना स्वाधीन करण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात 13 वर्षाचा मुलगा 2019 मध्ये रेल्वे स्थानकावर हलविला होता. रेल्वे पोलिसांनी त्याला बालसुधारगृहात पाठवले. शासनाच्या योजनांचा लाभ त्याला मिळावा यासाठी त्याचं आधार तयार करायला गेल्यावर त्याची मूळ ओळख पुढं आली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून त्याचं नाव शिवम चौहान असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या मूळ कुटुंबियांना संपर्क करून त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

हरवलेल्या मुलांना 'आधार' च्या माध्यमातून मिळाले कुटुंब
वांग- मराठवाडी धरणाचा पाणीसाठा लाल...

अशा प्रकारे आधार कार्ड असल्याने या दोन्ही मुलांना त्यांच्या मूळ कुटुंबाशी भेटले. त्यामुळे आधार कार्ड केवळ सरकारी कामांसाठी च महत्त्वाचे नसून स्वतःची ओळख निर्माण करणारे सुद्धा आहे, हे अधोरेखित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com