Today's Marathi News Live: इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या निकाल

Maharashtra Latest News and Update in Marathi (14 February 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Today's Live Batmya in Marathi (14 February 2024) | Latest Update on Ashok Chavan, Manoj Jarange, Farmer Protest and on overall Maharashtra
Today's Live Batmya in Marathi (14 February 2024) | Latest Update on Ashok Chavan, Manoj Jarange, Farmer Protest and on overall MaharashtraSaam TV
Published On

इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या निकाल

इलेक्ट्रॉल बॉड प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्ट निकाल देणार

5 न्यायधीशांचं खंडपीठ निकाल वाचणार

लोकसभा निवडणुकीच्या आधी येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष

वर्धा-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर इनोवा कारला भीषण अपघात

इनोव्हा गाडी थेट वर्धा नदीच्या पुलावरून 250 फूट खाली कोसळली

गाडीत तिघे जण असल्याची माहिती, एक जागीच ठार, दोन गंभीर जखमी

यवतमाळ वरून वर्धेकडे इनोव्हा गाडी येत असल्याची माहिती

वर्धा नदीच्या फुलावरून गाडी थेट नदीपात्रात

नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

पहिल्यांदाच नाशिकमध्ये इंडिया आघाडीची बैठक

नाशिक मध्ये होत असलेल्या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इंडिया आघाडीची बैठक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी

शासकीय निधीच्या खर्चात पक्षाचा सांस्कृतीक उपक्रम, इंडिया अलायन्सचा आरोप

वर्तमान केंद्र व राज्यातील सरकार सरकारी निधीच्या खर्चात भाजपचा सांस्कृतीक उपक्रमात करीत आहेत. तसेच वर्ध्याचे जिल्हाधिकारी सध्या भाजपचे एजंट म्हणून काम करीत असून ते शेतकरी प्रश्नावर, पीडित लोकांचा संपर्क सतत टाळत असल्याचा आरोप वर्धा लोकसभा क्षेत्रातील भारत जोडो अभियान, इंडिया अलायन्सने पत्रकार परिषदेत केला.

पद्मभूषण डॉ. सायरस पुनावाला यांना खासदार शरद पवार पुरस्कार

पद्मभूषण डॉ सायरस पुनावाला यांना खासदार शरद पवार पुरस्कार प्रदान करणार

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात कार्यक्रमाला सुरुवात

सकल मराठा समाजाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध

लाखो मराठ्यांच्या मनात नारायण राणे यांच्या विषयी आदराचे स्थान होते. मात्र आता ते राहिले नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी नेत्यांना आणि त्यांच्या मुलांनाच मराठ्यांचे नेते म्हणायचं का असा सणसणीत सवालच राणे यांना केला आहे

महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आसाराम बापूंच्या होर्डिंगवर फासलं काळं

महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात लावण्यात आलेल्या आसाराम बापूंच्या होर्डिंगवर काळं फासत आंदोलन केलंय. आसाराम बापूवर बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेय. त्यामुळे आसाराम बापूंचे होर्डिंग लावून समाजात नेमका कुठला संदेश द्यायचा आहेय. यालाच धरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आसाराम बापूच्या होर्डिंगवर बांबूच्या साह्याने काळ फासत जोरदार घोषणा दिल्यात..

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

सरकार विशेष अधिवेशन घेऊन तोडगा काढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे

सरकारची जी भूमिका आहे ती जरांगे यांनी समजून घेतली पाहिजे

20 तारीखला चार दिवस राहिलेत

नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांची काळजी करू नये; प्रवीण दरेकर

जरांगे पाटील यांनी सलाईन काढली, झोपेत असताना सलाईन लावल्याचा आरोप

सलाईन लावायची असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता सांगा

सरकारला धारेवर धरा जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

मी जर मेलो तर तसाच मला त्यांच्या दारात नेऊन टाका

मार्डच्या आंदोलनाला यश, शासकीय वैद्यकीय इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ

राज्य सरकारकडून आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार

आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप; प्रकाश अण्णा शेंडगे

मराठा आरक्षणाचा वादळ महाराष्ट्रावर घोंघावत आहे

त्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप करण्यात आलं

सत्तेचा वापर ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी घाला घालण्यासाठी करण्यात आला

सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्यातील ओबीसी भटके समाजाने ठरवलं...त्यानंतर आता पक्ष स्थापन करण्यात आला

मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर मांडला ठिय्या

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फोन लावून मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या शी बोलणं करून देण्याची मागणी

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या घराचे गेट लावून घेत सुरू केले आंदोलन

जोरदार घोषणा बाजी सुरू मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र येण्यास सुरुवात

जरांगे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलन

काँग्रेसच्या उमेदवारामुळे भाजपची यादी रखडली, चौथ्या उमेदवाराबाबत वरिष्ठ पातळीवर विचार सुरू

भाजप चौथा उमेदवार देणार अशा सुरू आहेत चर्चा

काँग्रेसने राज्यातील दलीत चेहरा चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिल्याने चर्चा सुरू

तीन नावांवर शिक्कामोर्तब मात्र चौथ्या नावाची चर्चा सुरू, सूत्रांची माहिती

भाजीपाल्याचे भाव पडले;कोंथिबीर १ रुपये जुडी तर कोबी १० रुपये किलो 

परभणी जिल्हात भाजीपाल्याचे भाव पडले असून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना भाजीपाला विकावा लागत आहे आज सकाळी शेतकऱ्यांनी भाजीमंडईत आपला भाजीपाला आणल्या नंतर मेथीजूडी/कोथिंबीर जुडी १ रुपयाला तर भेंडी/कोबी १० रुपये किलो टमाटे ४ते 5५ रुपये किलो असा भाव मिळाला आहे.

राष्ट्रवादी विलनीकरणाची चर्चा निरर्थक आणि खोटी

राष्ट्रवादी विलनीकरणाची चर्चा निरर्थक आणि खोटी

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला यांची साम टीव्हीला माहिती

अशा पद्धतीची कुठली चर्चा झाली नसल्याचं चैनितथल्ला यांचं स्पष्टीकरण

धाराशिवमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, कळंब-केज वाहतूक बंद

धाराशिवमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

कळंब शहराजवळील कळंब- केज येथील मांजरा पुलावर मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन

रस्त्यावर टायर पेटवून मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू केले रास्ता रोको आंदोलन

आंदोलनामुळे कळंब केज वाहतूक झाली बंद तर वाहनांच्या लागल्या रांगा

मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितला

मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितला

अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची मागासवर्ग आयोगाने केली विनंती

या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होऊन विशेष अधिवेशन कधी घ्यायचं यावरती शिक्कामोर्तब होण्याची आज दाट शक्यता

सोलापूर-धुळे हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या टॅंकरने १४ वर्षीय दोन शालेय विद्यार्थीनींना चिरडले

सोलापूर-धुळे हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या टॅंकरने १४ वर्षीय दोन शालेय विद्यार्थीनींना चिरडले

उमरगा तालुक्यातील येणेगुरजवळ घडली घटना

एका शालेय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू तर दुसऱ्या विद्यार्थीनीला उपचारासाठी सोलापूरला केले रेफर

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दाखल केला आपला उमेदवारी अर्ज

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दाखल केला आपला उमेदवारी अर्ज

सोनिया गांधी यांच्यासोबत नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांच्याशी चर्चा

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांच्याशी चर्चा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही गोष्टींवर एकमत झाले आहे - मुंडा

आम्ही काही गोष्टींवर चर्चा करण्यास तयार आहोत

त्यावर शेतकरी शिष्टमंडळही अनेक पर्याय देऊ शकतात आणि आम्हीही देऊ शकतो

पर्यायी मार्गावर येऊन आपण त्या गोष्टींवर उपायही शोधू शकतो

शेतकऱ्यांनी कोणाचीही दिशाभूल करू नये, असे आवाहन मुंडा यांनी केले

नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून बोंबाबोंब आंदोलन

नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून बोंबाबोंब आंदोलन

सगेसोयरे अध्यादेश कायद्यात रूपांतर करण्याची मागणी

गेल्या 5 दिवसापासून या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पाटील उपोषण करत आहेत

त्यांची तब्येत खालवत चालली आहे,त्यांना काही झाले तर राज्यात उद्रेक होईल

नाशिक सकल मराठा साजाचा इशारा

आज तातडीने सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण सोडवावे

आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक सुरू

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक सुरू..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची पहिलीच बैठक

पक्षाचे सर्व खासदार उपस्थितीत

सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची आमदारांची माहिती

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ही पहिलीच बैठक असल्याने अजून काही नवीन पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता

उल्हासनगर गोळीबार प्रकरण, गणपत गायकवाड यांना न्यायालीन कोठडी

महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना न्यायालीन कोठडी

आमदार गणपत गायकवाडांसह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मराठा आरक्षणाच्या अंमलबाजावणीसाठी उत्तर सोलापूर बंद

मराठा आरक्षणाची अंमलबाजावणी व्हावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.त्याचे पडसाद उत्तर सोलापूर तालुक्यात दिसून येत आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.मराठा आरक्षणाची अंमलबाजावणी व्हावी अन्यथा यापुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.या बंदचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी...

मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव सुरु झाल्याने खळबळ, आरोग्य पथक उपोषणस्थळी दाखल

मराठा आरक्षणाच्या मागणसाठी मनोज जरांगे पाटील यांचं पाचव्या दिवशी उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरु झाल्याने एकच खबळ उडालीय. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आरोग्यपथक दाखल झालं आहे. नाकातून रक्त येणे हे गंभीर लक्षण असल्याचं आरोग्य पथकातील डॉक्टरांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या कारणाने रक्तस्राव होऊ शकतो, असं आरोग्य पथकातील डॉक्टरांचं म्हणणं आहे.

नागपूर : भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपूर : भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

चिंचुभवन परिसरातील घटना, बेलतरोडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

वाहतूक कोंडी होत असतात वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न  करण्याची गरज

उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातील कोपरगाव, संगमनेर आणि अकोले विधानसभा मदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या सभा

कोपरगावमधून करणार दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याची सुरुवात

काल सोनई, श्रीरामपूरमध्ये आणि राहातामध्ये पार पडल्या उद्धव ठाकरेंच्या सभा

सभांमधून मोदी, अमित शहा, फडणवीस यांच्यासह भाजपवर उद्धव ठाकरे यांची कडाडून टीका

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशीव जिल्ह्यात आज कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशीव जिल्ह्यात आज कडकडीत बंद

सकाळपासूनच दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी दर्शवला बंदला पाठिंबा

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातून वगळण्यात आलं

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातून वगळण्यात आलं

आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश संदीप शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलाय

मराठा आरक्षणाबाबत मेश्राम यांनी संदीप शुक्रे यांच्या भुमिकेपेक्षा वेगळी भुमिका घेतल्याने त्यांची हकालपट्टी झाल्याची चर्चाय

मात्र अद्याप आपल्याला आपली हकालपट्टी झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही असं मेश्राम यांनी म्हटलं

राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणानंतर अहवाल सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com