याला म्हणतात धाडस! १०० फूट पाठलाग करत शेजाऱ्यानं तिला बिबट्याच्या तावडीतून वाचवले, वैजापुरात थरार

Leopard attack, Vaijapur taluka, Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये शेजारी देवदुतासारखा धावत आला. त्यानं १०० फूट बिबट्याचा पाठलाग करत सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला. बिबट्याच्या हल्यात मुलगी गंभीर जखमी झाली, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
A six-year-old girl was rescued from a leopard attack by a brave neighbor after a 100-foot chase in Vaijapur, Sambhajinagar. The heroic act prevented a tragic incident, highlighting rising wildlife threats in the region
बिबट्या (संग्रहित छायाचित्र)
Published On

Leopard attack, Vaijapur taluka, Sambhajinagar news : बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या ६ वर्षीय मुलीला एका व्यक्तीने १०० फुटापर्यंत पाठलाग करून वाचवल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातल्या तलवाडा येथे घडलीय. बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीला वाचवण्यासाठी शेजाऱ्याने जिवाची बाजी लावून बिबट्याचा १०० फुटांपर्यंत पाठलाग केल्याने चिमुकली थोडक्यात बचावली. हा अंगावर शहारे आणणारा थरार वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे रविवारी घडला.

तलवाडा गावालगत आयनार वस्ती असून येथील बालिका श्रुती नामदेव आयनर (६) ही नेहमीप्रमाणे घराच्या पाठीमागे रविवारी सायंकाळी खेळत होती. याच वेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरडा ऐकू आल्याने कडू बोडखे, दिनकर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता १०० फुटांपर्यंत पाठलाग करून मुलीला बिबट्याच्या ताबडीतून वाचवले. बालिकेच्या मानेवर, कानावर व गालावर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथील आयनार वस्ती येथील बालीका श्रुती नामदेव आयनर वय वर्ष 6 हिच्यावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. मुलगी घराच्या पाठीमागे खेळत असताना बिबट्याने हल्ला केला, अन् घेऊन जात असताना कडू बोडखे, दिनकर पवार यांनी शंभर फुटांपर्यंत बिबट्याचा पाठलाग करून मुलीला वाचवले. मुलीला संभाजीनगर येथील सेंचुरी हॉस्पीटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तलवाडा येथील पनरीश्रेञात वन्य प्राण्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. या पूर्वी देखील ब्हळेगाव येथे सात जणांना बिबट्याने जखमी कले होते. मन्याड खोर्‍यात देखील एका बिबट्याचा साबर काडींच्या झाडात आडकून मुत्यू झाला होता. त्या वेळीही वन विभागाच्या आधिकाऱ्यांनी इकडे बिबट्या नाहीत असे सांगत हात झटकले होते.

या घटनेचा धसका संपूर्ण गावाने घेतला आहे. त्यात रानवस्ती बरोबर गावात भर वस्तीतही बिबट्या राजरोसपणे दिसून येत आहे. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागा वर संताप व्यक्त होत आहे. याच रस्त्याने गावातील शाळकरी मुले ये-जा करत असतात. त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास रास्ता रोकोसह संबंधित वनविभागाच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com