दोघे खंबीर होते, मग काय झालं ? वेदांता प्रकल्पावरुन अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

वेदांता-फॉक्सकॉनचा नियोजीत प्रकल्प गुजरातला गेला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV

बीड: वेदांता-फॉक्सकॉनचा नियोजीत प्रकल्प गुजरातला गेला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली.

आज विरोधी पक्षनेते अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

Ajit Pawar Eknath Shinde
Sharad Pawar: सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये असं सत्ताधाऱ्यांचं धोरण; 'गृहपाठ'वरून शरद पवारांनी घेतली 'शाळा'

राज्यात शिंदें-फडणवीस सरकार सत्तेत येऊन तीन महिने झाले होते, त्यावेळी यांना वेदांता संदर्भात कळाले होते. तेव्हापासून ९० दिवस पूर्ण झाले. यांनी या संदर्भात कोणताही प्रयत्न केला नाही. स्वत: प्रयत्न करायचा नाही फक्त टीका करायची. वास्तविक दोघजण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. त्यावेळी ते म्हणत होते आम्ही खंबीर आहोत. मग आता काय झाले, असा टोलाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

वेदांता सारखे दुसरे राज्याच्या हिताचे प्रकल्प असतील आणि पर्यावरणाला कुठलाही त्रास होणार नसेल तर आमची अशा प्रकल्पांन संमती आहे. मी विरोधी पक्ष नेता या नात्याने सहकार्य करायला तयार आहे, असंही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Eknath Shinde
Breaking News : बनावट नाेटा छपाईच्या कारखान्यावर पाेलिसांची रेड; सव्वा सात लाखांसह एक ताब्यात

महाविकास आघाडीवर टक्केवारी मागितल्याचे आरोप

तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने टक्केवारी मागितली होती असा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपाला राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार आशिष शेलार यांचे आरोप खोटे असून हा प्रकल्प गुजरातेमध्ये कसा गेला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com