Latur: औशात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; ऐन पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय

धरण भरून वाहत असताना औसेकर मात्र पाण्यासाठी टाहो फोडत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे लातूरकरांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे तावरजा व तेरणा दोन्ही धरण भरून वाहत असताना औसेकर मात्र पाण्यासाठी टाहो फोडत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत असून वाला येथील प्रशासक व मुख्याधिकारी यांची निष्क्रीयता चव्हाट्यावर आली असून पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या औशाला कुणी वाली आहे का? असा प्रश्न औसेकर विचारत आहेत.

हे देखील पाहा -

औसा येथील नगरपालिकेवर नऊ महिन्यापासून प्रशासक आले यामुळे सगळा कारभार मुख्याधिकारी यांच्याकडे आला. त्यातच सध्या असलेले मुख्याधिकारी हे प्रभारी चाकूरचा कारभार सांभाळत औशाचा कारभार सांभाळणाऱ्या या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा त्यांचे दर्शन औसेकर घेतात. यामुळे शहरातील नगरपालिकेच्या प्रशासकीय कामाची सगळी भिस्त कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावरच आहे.

Latur News
Amravati : शॉक लागून वसतीगृह अधीक्षकांचा मृत्यू; येवद्यात शाेककळा

मागील काही महिन्यांपासून शहरात तांत्रिक कारणामुळे अनेक वेळा शहराला पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असताना प्रभारी मुख्याधिकारी मात्र बेफिकीर दिसले. एवढ्या मोठ्या शहराला कायमस्वरूपी मुख्याधिका नसल्यास त्याचा किती मोठा फटका बसत असत आहे औसा नगर पालिकेवर प्रशासक असल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांतील आजी माजी पदाधिकारी जनतेच्या प्रश्नावर बोलत नाहीत यामुळे लोकांत त्यांच्या विपयी चीड निर्माण झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com