Lumpy Disease: लम्‍पीग्रस्‍त गाईच्या दुधातून विषाणू बाहेर पडतात; पण उकडल्यास दूधही उत्तम

लम्‍पीग्रस्‍त गाईच्या दुधातून विषाणू बाहेर पडतात; पण उकडल्यास दूधही उत्तम
Lumpy Disease Milk
Lumpy Disease MilkSaam tv

लातूर : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लम्पी आजारामुळे मांस आणि दुधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यास धोका असल्याचा अफवा पसरल्याने नागरिकांत भीती आहे. पण (Lumpy Disease) लम्पी चर्मरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अनिल भिकाने यांनी बिनधास्तपणे (Cow) गाईचे दूध आणि अन्य प्राण्याच्या मासांपासून मानवी आरोग्यास धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Latur News Lumpy Disease)

Lumpy Disease Milk
Jalgaon: गॅसचा अवैध वापर; वाहनात स्वयंपाकाचा गॅस भरताना दोघांना अटक

सध्याला लम्पी रोगाबद्दल सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या बाबी व्हायरल झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गाय आणि म्हैस या प्राण्यांसोबतच इतर प्राण्याला लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या बाबी (Latur) व्हायरल झाल्या आहेत. दुधापासून मानवी आरोग्याला धोका आहे. शेळी, मेंढी, कोंबडी आदी प्राण्याच्या मांसाचे सेवन केल्यास माणसाला लागण होवू शकते. अशा अफवा पसरवल्‍या जात आहेत.

शेळी, मेंढीत लम्‍पी नाही

राज्य लम्पी चर्मरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अनिल भिकाने यांनी स्पष्ट केले आहे, की लम्पी रोग सध्या केवळ गोवंशात होत आहे. म्हैसीत क्वचीत रोग होत असला तरी राज्यात एकाही म्हशीत रोगाची नोंद झाली नाही. शेळी, मेंढी, कोंबडी यांच्यात आजतागायत हा आजार दिसून आला नाही.

विषाणू दूधातून बाहेर येतात..

लम्पी आजाराचे विषाणू लंपीग्रस्त गायीच्या दुधातून बाहेर पडतात. परंतु त्यातून माणसात रोग प्रादुर्भाव अजिबात होत नाही. लंपीचे विषाणू दुध ७० डिग्री सेल्सीयसला १-३ मिनिटे उकळल्यास निष्प्रभ होतात. मात्र शास्त्रीय दृष्ट्या लोकांनी नेहमीच गायीचे दूध अथवा अन्य प्राण्याच्या मासांचे सेवण करायचे झाल्यास दूध चांगले उकळून प्यावे. तर मांस उत्तमरितीने शिजवून खावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com