Latur: सांगा आमच्या हक्काचा वाटा कुठं हाय; आक्रोश मोर्चाद्वारे तृतीय पंथीयांचा प्रश्‍न

सांगा आमच्या हक्काचा वाटा कुठं हाय; आक्रोश मोर्चाद्वारे तृतीय पंथीयांचा प्रश्‍न
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

लातूर : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सर्वत्र आनंदात सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार (Latur News) मिळाले नाहीत. अजूनही त्यांना माणूस म्हणून समाजाने मान्यता दिली नाही. त्यांच्या वाट्याला सतत अपमानाचीच वागणूक येते. यासह अन्य कारणाने तृतीय पंथीयांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर (Udgir) येथे मोर्चा काढला आहे. (Latur Today News)

Latur News
गडचिरोली पोलीस दलातील 41 जणांना पोलीस शौर्य पदक

एकीकडे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंदोत्सव केला जातोय. पण दुसरीकडे तृतीयपंथीयांना दुःखाशी सामना करावा लागत असल्यामुळे सांगा आमच्या हक्काचा वाटा कुठं हाय रं? असा प्रश्न त्यांनी व्यवस्थेला विचारला आहे. परवा त्यांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले. पण त्यांना (Ration) रेशनचा लाभ घेता आला नाही. स्वस्त धान्य दुकान बंद असल्याचे सांगण्यात येते. घरकुल मिळाले पाहिजे, स्वतंत्र स्मशानभूमी मिळाली पाहिजे, शासकीय नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे, राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे. या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. या मागण्यांबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व तृतीय पंथीयांच्या गुरू माया पटेल व अंजली पटेल यांनी केले. ये आझादी झुठी है, आमच्या मागण्या मान्य करा, तृतीयपंथीयांचे हक्क अधिकार मिळालेच पाहिजेत, तृतीयपंथीयांना सन्मान मिळालाच पाहिजे अशा अनेक घोषणांद्वारे तृतीयपंथी यांनी त्यांचे प्रश्न समाजासमोर मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. कॅप्टन कृष्णकांत चौक, नाईक चौक ते तहसीलदार यांना तृतीय पंथीयांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांना निवेदन दिले.

तिरंगा आहे पण स्वतःचे घर नाही

तृतीय पंथीयांना राहण्यासाठी कोणी घरही देत नाही. हर घर तिरंगा या अभियानात त्यांना सहभागी व्हायचंय. त्यांच्याकडे झेंडे आहेत. पण झेंडा लावायला स्वतःचे घर नाही. अनंत अडचणींशी ते सामना करत जगत आहेत. शासनाकडे वारंवार त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. पण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. या आक्रोश मोर्चासाठी माया पटेल, वैष्णवी पटेल, रूपा पटेल, गौरी पटेल, सपना पटेल, रवीना पटेल, गायत्री पटेल, आलिया पटेल, पिंका पटेल, पूजा पटेल यांच्यासह उदगीर व परिसरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com