लातूर: चार शेतकऱ्यांचा 12 एकर ऊस जळून खाक; लाखोंचे आर्थिक नुकसान

वंजारवाडी येथील चार शेतकऱ्यांचा १२ एकर ऊस व ७० पाईप जळून खाक
ऊस जळून खाक
ऊस जळून खाकदीपक क्षीरसागर
Published On

दीपक क्षीरसागर

लातूर : अहमदपूर तालुक्यातीत वंजारवाडी गावातील चार शेतकऱ्यांच्या शिवारातील ऊसाला अचानक लागलेल्या आगीमुळे तब्बल १२ एकर वरील ऊस तसेच एका शेतकऱ्याचे जवळपास ६० ते ७० पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकरी राहुल सारुळे, ज्ञानोबा सारूळे, भाग्यश्री आरदवाड, नामदेव सारूळे हे रहिवासी असुन या चार शेतकऱ्यांच्या वंजारवाडी शिवारात असलेल्या शेतातील ऊसाला आग लागली. दुपारी अंदाजे २ वाजता अचानक लागलेल्या आगीमुळे संबधीत चार शेतकऱ्यांचा जवळपास १२ एकर ऊस तसेच संतोष सारूळे या एका शेतकऱ्याचे रिलायन्स कंपनीचे ६० ते ७० पाईप जळून खाक झाले आहेत.

ऊस जळून खाक
" मॅडम मी राजीनामा देतो..."; पंजाबमधील पराभवानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा !

यामुळे वंजारवाडी येथील पाच शेतकऱ्यांचे लाखोचे आर्थिक नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे टाकले आहे सदरील आग लागली असल्याची माहीती गावात समजताच गावकऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्यामुळे अहमदपूर येथील नगरपालीकेच्या अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. यामुळे आग आटोक्यात येऊन पुढे होणारे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे.

हे देखील पहा-

शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच चार जणांचा १२ एकर ऊस व एका शेतकऱ्याचे रिलायन्स कंपनीचे ६० ते ७० पाईप जळून खाक झाल्याचे पाहुन शेतकऱ्यांनी व त्यांच्या घरच्या महीलांनी एकच हंबरडा फोडला. वंजारवाडी येथील शेतकरी अरूण चोले यांनी दिलेल्या माहीतीनुसार शिवारातील लोंबकाळलेल्या विजेच्या तारांमुळे एकमेकांना घर्षण होऊन आग लागली असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com