Latur: अवैध धंद्यांच्या विरुद्ध तीन दिवसात १५६ गुन्हे दाखल; लाखोंचा मुद्देमाल जप्त

जुगारचे साहित्य, रोख रक्कम असा १ लाख ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
Latur: अवैध धंद्यांच्या विरुद्ध तीन दिवसात १५६ गुन्हे दाखल; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Published On

लातूर - पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध ३ दिवसात १५६ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच लातूर (Latur) ग्रामीण पोलिसांचा जुगारावर छापा मारत जुगारचे साहित्य, रोख रक्कम असा १ लाख ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच ११ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील पाहा -

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते. ६ ते ८ ऑगस्ट पर्यंत अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत जुगार कायदा, दारूबंदी कायदा, जीवनाशक्य वस्तू अधिनियम प्रमाणे कार्यवाही करून जिल्हाभरात विविध पोलीस स्टेशनला केवळ ३ दिवसात १५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Latur: अवैध धंद्यांच्या विरुद्ध तीन दिवसात १५६ गुन्हे दाखल; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Petrol Diesel: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी; जाणून घ्या आजचे नवीन दर

मोहीम अंतर्गत पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकास मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हद्दीतील चांडेश्वर शिवारातील एका ठिकाणी छापा मारला.

स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना शंकर खंडेराव शितळकर, दीपक सुभाष सुरवसे, सिद्राम गणपत साठे, ज्योतीराम शहाजी काळे, इब्राहिम अन्वर शेख, एजाज मोहम्मद हुसेन, अल्फर झह र शेख, निशिकांत गणेश उडगे, दशरथ प्रभू देवकते, लखन सुरनर व एक अनोळखी फरार व्यक्ती यांचा समावेश आहे या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com