Latur Accident News: लग्न करुन परतताना काळाने केला घात! भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू; गावावर शोककळा

Accident News: भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..
Accident News
Accident NewsSaam tv

Latur Accident News: नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचा लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात लातूर जिल्ह्यातील (Latur) चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला.औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ अपघात घडला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात खळबळ माजली आहे.. (Latest Marathi News Update)

Accident News
Beed Cyber Crime: सावधान! पॅनकार्डच्या नावाखाली दोघांची ऑनलाइन फसवणूक; 75 हजारांना घातला गंडा

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी पुण्याहून निलंगा येथील बडूरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचे पुण्याला लग्न समारंभ आटोपून निघाले होते. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाखाली पलटी झाली. यामध्ये अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले असून त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

Accident News
Gautami Patil News : सबसे कातील गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा बरसले इंदुरीकर महाराज; सांगितला स्वत: अनुभवलेला प्रसंग

लग्नानंतर नवरा नवरी आणि वऱ्हाडी दोन वाहनाने गावी निघाले होते. यातील नवरा नवरी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. अपघातात गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांवर काळानेघाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com