LIVE Breaking News : मालाड जळीतकांड दुर्घटनेत एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची नागरिकांकडून भीती व्यक्त

Marathi Live News : लालजी गुप्ता अस मृत व्यक्तीचे नाव आहे.
SAAM TV Breaking News LIve Updates In Marathi
SAAM TV Breaking News LIve Updates In MarathiSAAM TV

मालाड जळीतकांड दुर्घटनेत एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची नागरिकांकडून भीती व्यक्त

मुंबईच्या मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातील आप्पा पाडा आनंदनगर भागातील झोपडपट्टीला आग लागल्याची दुर्घटना घडली होती. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र या आगीत एक व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे.

लालजी गुप्ता अस मृत व्यक्तीचे नाव आहे. आता या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. अंधार असल्यामुळे इथे अजून काही व्यक्ती मृत झाल्या असू शकतात अशी भीती आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री अनिल परब यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. महाराष्ट्रातील दापोली येथील रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी. परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका. प्रकरणाची तातडीची सुनावणी करण्यात यावी जेणेकरून जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळेल याचिकेद्वारे मागणी. याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर उद्या होणार सुनावणी.

सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राज ठाकरे यांच्या सभा, भाषणांवर बंदीची मागणी; महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र

राज ठाकरे यांच्या सभेवर व भाषणावर बंदी घालावी, भीम आर्मी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र. राज ठाकरे दरवेळी आपल्या भाषणातून दलित, मुस्लिम आणि संविधान विरोधी भूमिका घेत असतात. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना असंविधानिक कृत्य करण्यास सांगतात. त्यामुळेच राज ठाकरे यांना शिवाजी पार्क येथे सभेसाठी परवानगी देऊ नये, असं पत्र भीम आर्मीने महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना लिहिलं आहे.

मुंबईत आगीचं सत्र सुरूच; मालाड येथील झोपडपट्टीला आग

मुंबईत मागील काही दिवसापासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी लागलेल्या झोपडपट्टीला लागलेल्या आगीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . जोगेश्वरीची घटना ताजी असताना आता मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा आनंदनगर परिसरातील झोपडपट्टीला देखील आग लागल्याची घटना पुढे आली आहे.

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी SIT चौकशी होणार

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी SIT चौकशी होणार, शंभुराज देसाई यांनी दिली माहिती

सांगली: वसंतदादा साखर कारखाना बंद करण्याचे आदेश

कृष्णा नदीपात्रातील मासे मृत्यूप्रकरणी प्रदूषण मंडळाचा थेट वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाईचा बडगा

पुढील आदेश येईपर्यंत कारखाना बंद करण्याचे आदेश

वसंतदादा कारखान्यात साखर निर्मिती होणार ठप्प

२४ तासांत वसंतदादा साखर कारखान्याचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे संबंधित विभागाला प्रदूषण मंडळाचे आदेश जारी

कारखान्याचा मळीमिश्रित पाणी शेरीनाल्याद्वारे कृष्णा नदीच्या पाण्यात मिसळत असल्याने केली कारवाई

गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास ३ महिने शिक्षा, १० हजार दंड; राज्य सरकारचा प्रस्ताव

गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास तीन महिने शिक्षा आणि दहा हजारांचा दंड प्रस्तावित असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

तसेच असा प्रकार निदर्शनास आणून देणाऱ्यास त्याला ५० टक्के इनाम देता येईल का, यासंदर्भात विधी व न्याय विभागाला मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. गड-किल्ल्यांवर हेरिटेज मार्शल नेमणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी साईनाथ दुर्गेला पोलिसांनी घेतले ताब्यात

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी घेतले ताब्यात

दहिसर पोलीस ठाण्यात सध्या त्यांची चौकशी सुरू

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतरही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम

उद्यापासून राज्यभरातील १९ लाख सरकारी आणि निम-सरकारी कर्मचारी पुकारणार संप

सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम

सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात येत असले तरी, निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचारी संपावर जाणार

महानंद डेअरी एनडीडीबीला चालवायला देणार असल्याची दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

महानंद डेअरी एनडीडीबीला चालवायला देणार असल्याची दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. महानंदचे पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही एनडीडीबीलाच प्राधान्य देणार, खाजगी संस्थेला किंवा कंपनीला आम्ही महानंदला देणार नाही. ९४० पैकी ३५० कामगारांना सामावून घेऊ शकत असल्याची अट एनडीडीबीने घातल्याची माहिती. सध्या असलेल्या सर्व कामगारांना सामावून घेता येणार नसल्याचे एनडीडीबीचे म्हणणे. महानंद डेअरीची सध्या आर्थिक स्थिती अडचणीची असून कामगारांचे पगार देण्यासाठीही पैसे नसल्याचे समोर.

मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री दरोडा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहन अडवून दरोडा

पेण सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

मध्यरात्री तीन वाजता घडली घटना

चार ते पाच जणांना रॉड, स्टम्पने मारहाण करून १५ तोळे सोने लुटल्याचा आरोप

पेणजवळ घडली घटना

पनवेलमधून १०० हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून मागितली मदत

पेण सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू

पेण पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग घटनास्थळी पोहोचले

रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे घटनास्थळी भेट देणार

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतला भाजीपाला

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतला भाजीपाला

कांद्यासह टोमॅटो, कोथिंबीर, वांगे रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी व्यक्त केला निषेध

शेतमालाला हमीभाव द्या, शेतकऱ्यांची मागणी

शेतकरी लाँग मार्च नाशिकच्या निमाणी चौकात पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतला भाजीपाला

जुनी पेन्शन योजनेसंदर्भात चर्चेसाठी विधीमंडळ दालनात महत्वाची बैठक

जुनी पेन्शन योजनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी विधीमंडळ दालनात महत्वाची बैठक घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.

अरविंद केजरीवाल, राजीनामा द्या; भाजपची मागणी

मद्य धोरण घोटाळा प्रकरणावरून भाजपने आम आदमी पक्षाची कोंडी केली आहे. दिल्ली भाजपने मूक आंदोलन केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या आंदोलकांनी केली आहे.

अमरावतीत तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचं आंदोलन

नायब तहसीलदार या राजपत्रित वर्ग 2 पदावर कार्यरत असलेल्या महसूल विभागाच्या महत्वाच्या पदाला सध्या 4300 रुपये इतका ग्रेड पे मिळत आहे. तो ग्रेड पे वाढवून तो इतर विभागातील समकक्ष राजपत्रित वर्ग 2 पदाच्या ग्रेड पे इतका म्हणजे 4800 इतका करण्यासाठी आज अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदारांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय सामूहिक रजेवर जात धरणे आंदोलन केलं.

त्यावेळी आपल्या मागण्यांसाठी महसूल अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्या. तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या संपामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबल्याचे दिसून आले.

बीडमध्ये अनोखं लक्षवेधी टरबूज आंदोलन

लोकप्रतिनिधींचे निवृत्तीवेतन बंद करून राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करा, ही प्रमुख मागणी घेऊन बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या "मेस्मा " दडपशाहीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनोखं "लक्षवेधी टरबूज आंदोलन" करण्यात आलं.

पुणे: एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा बहिष्कार

एका दिव्यांग विद्यार्थिनीला सुविधा उपलब्ध करून न दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन

विद्यार्थिनीला सोयी नसल्याने मुकावं लागलं अभ्यासक्रमाला

तिच्या वैद्यकीय रजेला तिची अनुपस्थिती म्हणून गृहीत धरत तिला एफटीआयआय सोडण्याचे आदेश दिल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

शीतल तू लढ, आम्ही सर्व तुझ्यासोबत - चित्रा वाघ

शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत.

हा विषय फक्त शीतलपुरता मर्यादीत नाहीच. राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील, असे वाघ म्हणाल्या.

दोषींना सोडू नका, पण यांचा करविता धनी कोण आहे? त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा, असे आवाहन त्यांनी मुंबई पोलिसांना केले आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या परदेशातील वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.

प्रवीण दरेकर यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. एखादी तक्रार आली की त्याची चौकशी होते. संजय राऊत यांच्यावर जो हक्कभंग आणला आहे, त्या समितीचे अध्यक्ष राहुल कुल आहेत. म्हणून अशा पद्धतीने त्यातून काही निघेल का? राहुल यांच्यावर दबाव आणता येईल का, या अनुषंगाने त्यांनी तक्रार केली असावी, असे दरेकर म्हणाले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विधान हे चुकीचेच आहे ; परंतु अशा पद्धतीचे विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा उद्देश नसावा. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार गंभीर आहे, असेही दरेकर म्हणाले.

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव अजूनही नॉट रिचेबल

हसन मुश्रीफ यांच्यासह सीए महेश गुरव हे ईडीच्या रडारवर

कागलमधील ईडीच्या छाप्यानंतर महेश गुरव हे नॉट रिचेबल आहेत.

मुंबई: धनगर समाजाकडून देवेंद्र फडणवीसांचा सत्कार

धनगर समाजाकडून देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. सर्व समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले.

अदानी मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात विरोधक आक्रमक

नवी दिल्ली: विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले. अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी विरोधकांनी केली.

मुंबईत ओशिवरा परिसरातील फर्निचर मार्केटला भीषण आग

जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा भागात असणाऱ्या रिलीफ रोडवरील फर्निचर मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचरची दुकाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान ३०० रुपये प्रतिक्विंटल देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कांदा प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याची घोषणा शिंदे यांनी सभागृहात केली. ते म्हणाले, की , २०१६-१७ मध्ये १०० रुपये दिले होते.

आता ३०० रुपये देत आहोत. शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ही केवळ घोषणा नाही, तर कार्यवाही आहे. तुम्ही फक्त गाजर दाखवता, आम्ही गाजर हलवा दिला, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com