धक्कादायक ! कोविड सेंटर मधील जेवणात चक्क अळ्या आणि झुरळं

लोणार येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणामध्ये अळ्या, झुरळ आणि किडे निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक ! कोविड सेंटर मधील जेवणात चक्क अळ्या आणि झुरळं
धक्कादायक ! कोविड सेंटर मधील जेवणात चक्क अळ्या आणि झुरळं संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : लोणार Lonar येथील कोविड सेंटरमध्ये Covid Center रुग्णांच्या जेवणामध्ये अळ्या, झुरळ आणि किडे निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जीवघेण्या प्रकारामुळे आज यासंदर्भात तक्रारी नोंदवली असून भरती असलेल्या रुग्णांनी हे जेवण नाकारले आहे. Larvae and cockroaches in the meal at the Covid Center

हे देखील पहा-

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोणा रुग्णांचा आकडा कमी होत असला तरीही कोरोना अजून पूर्णपणे हद्दपार झालेला नाही, आजही जिल्ह्यामध्ये 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत... तर लोणार येथील कोविड सेंटरमध्ये कोरोणा पॉझिटिव रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये अक्षरशा किडे, झुरळ आणि अळ्या निघत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

तसे व्हिडीओ व फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याने स्थानिक आरोग्य विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.

धक्कादायक ! कोविड सेंटर मधील जेवणात चक्क अळ्या आणि झुरळं
गावात पारधी नको, म्हणत गावकऱ्यांनी टाकला बहिष्कार !

लोणार तालुक्यातील चोरपांग्रा हे गाव तालुक्यात कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. या गावांमध्ये आतापर्यंत 75 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मात्र गावातील रुग्णांना लोणार येथील कोविड सेंटर मध्ये भरती केल्यास त्यांना निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यास धोकादायक जेवण दिल्या जात असल्याने हे रुग्ण आता बाहेर निघण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ गंभीरतेने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि रुग्णांच्या जीवाशी होत असलेला खेळ थांबवावा अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com