मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्येक क्षणी असे वाटत आहे त्याच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहे. ठाकरे सरकारला भीती वाटणे ही स्वाभाविकच आहे. मंत्री जेलमध्ये अनेक मंत्री बेलवर ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे की कोणत्या ही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका जळू शकते असं वक्तव्य भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं आहे.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे रोज उठून सौमय्याला घाबरून काहीही आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे सकाळी उठल्यावर हे जे सोमय्या ग्राऊंड आहे इथे भाजपची सभा होत आहे. ते ग्राऊंड पण किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची संपत्ती असे करून जेल मध्ये टाकण्याचा प्रयास करू शकतात. असे कालच्या सभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले आहे.
आता आग लावण्याचे काम म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचे आग लावण्याचे काम आणि घोटाळे बाजांवर कारवाई होणार आता आम्ही सर्वजन ॲक्शन मोडमध्ये गेलो आहोत. आज देखील मी दिल्लीत एका वरिष्ठ नेत्यांशी बोललो श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) म्हणजे उद्धव ठाकरे यांचे साले त्यांच्या आणखी एका बेनामी कंपनी च्या संपत्तीची माहिती मी दिली आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी दिल्लीला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितंल.
हे देखील पाहा -
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुंबई मेट्रोची वाट लावण्यासाठी पर्यावरणाची भाषा करत होते. आता हे माफियांना भोंगे ऐकायला येत नाही का? विनापरवाना मशिदीवरील भोंगे बंद व्हायलाच पाहिजे हे भाजप देखील म्हणणे आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत, तुमच्या द्वारा पोलिस तक्रार करायला सांगतात. तुम्ही आरोप केले संजय राऊतद्वारा जेलमध्ये टाकायला निघाले होते. नील आणि किरीट सोमय्या यांना ५७ कोटींचा घोटळा म्हणत आहेत, ५७ पैशांचा कागद दिला नाही. आता जाऊन EWO द्या; का आता संजय राऊत देत नाहीत, म्हणून हे दडरपोक लोक आहेत. स्वतःच्या प्रॉपर्टी जप्त करणे म्हणून भीती आहे. मी सांगतो मुंबई पोलिसांना २ दिवसांत माफी नाही मानहानीचा दावा दाखल करणार त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचंही सोमय्या म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.