Ladki Bahin Yojna : विधानसभेत 'लाडकी बहीण' ठरली गेमचेंजर, मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मिम्सचा पाऊस, वाचून पोट धरून हसाल

Memes And Reels On Ladki Bahin : बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या सोशल मिडियावर रील्स आणि मिम्स व्हायरल होत आहे. मात्र वेगवेगळ्या मार्गांनी सतत चर्चेत राहिलेल्या या योजनेने महायुतीला विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin YojnaSaamTv
Published On

Ladki Bahin yojana Reels and Memes: राज्यात काल महायुतीचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या तब्बल 235 आमदारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपने 132 जागा जिंकल्याने राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

हा अनपेक्षित विजय कसा मिळाला? याचं उत्तर म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना. यावेळी विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने कमालीची जादू केलेली दिसली आहे.

Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही, नेमकं कसं तपासायचं? 

महायुती सरकारनं जुलै महिन्यात लाडकी बहीण ही योजना जाहीर करून महिलांच्या खात्यावर प्रति महिना दीड हजार देण्याची घोषणा केली. त्यानंतर दिवाळीपर्यंत राज्याच्या महिलांच्या खात्यात सात हजारांची रक्कम जमा झाली. त्याचाच परिणाम म्हणून महायुतीच्या लाडक्या भावांना बहिणीने मतदान केलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील की नाही? शपथविधीनंतर योजनेबाबत काय म्हणाले CM फडणवीस?

या योजनेच्या पैशांत देखील आता वाढ होणार असल्याने महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स, व्हिडीओंचा महापूरच आला आहे. काहींनी या योजनेवरून मीम्सच्या माध्यमातून महायुती सरकारवर 'निशाना' साधला आहे. तर काहींनी या योजनेचं कौतुक केलं आहे. सध्या इंस्टाग्रामवरील हे रील्स चांगलेच व्हायरल होतांना दिसत आहेत.

एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे सोशल मिडियावर विनोदी रिल्स, मिम्सचा धुमाकूळ सोशल मीडिया युजर्ससाठी मनोरंजनाचा विषय ठरत आहे.

Ladki Bahin Yojna
Primary School Time : राज्यात थंडीचा जोर वाढला; आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊला भरणार, कुणी दिला आदेश?

मात्र, या सगळ्या आरोप प्रत्यारोप आणि विनोदानंतर देखील केवळ या एका योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं आहे, ते ऐतिहासिकच म्हणावं लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आला असल्याचं विरोधकांना देखील मान्य करावं लागलं आहे.

चला तर मग पाहू लाडकी बहीण योजनेवर व्हायरल होणाऱ्या मजेशीर मीम्स..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com