Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १६५ कोटींचा घोटाळा; १२ हजार पुरुष लाभार्थी; पैसे वसूल करणार

Ladki Bahin Yojana 12 Thousand Men Take Benefit: लाडकी बहीण योजनेबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. योजनेचा १२ हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे. त्यांच्यावर आता कारवाई केली जात आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

१२ हजार पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ

अपात्र महिलांनी लाटले कोट्यवधी रुपये

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, त्याआधीच लाडकी बहीण योजनेत फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास हजारो अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांनी सरकारचे कोट्यवधी रुपये लाटले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : २६ लाख अपात्र महिला अन् १४ हजार पुरूषांनी घेतला लाडकीचा लाभ, सरकारचं कोट्यवधींचं नुकसान

अपात्र लाभार्थ्यांनी सरकारने १६५ कोटी लाटले

लाडकी बहीण योजनेत तब्बल १६५ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांना वाटले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही कबुली दिली आहे. या योजनेत १२,४३१ पुरुषांनी तर ७७,००० अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. पुरुषांनी २५ कोटी रुपये तर अपात्र महिलांनी १४० कोटी रुपये लाटल्याचे उघड झाले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २० दिवस, eKYC न करणाऱ्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार नाहीत? अधिवेशनात काय चर्चा झाली?

शासकीय कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरु

लाडकी बहीण योजनेत ९,५२६ शासकीय महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. शासनाकडून आता या पैशांची वसुली आणि रितसर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले आहेत. त्यांच्याकडून आता वसूली केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झालीय? फक्त २ मिनिटांत करा दुरूस्ती; फॉलो करा ही प्रोसेस

लाडकीला २१०० कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment)

लाडकी बहीण योजनेत लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अजूनही महिलांना २१०० रुपये देण्यात आले नाहीत, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. योग्य वेळ आल्यावर महिलांना पैसे दिले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महिला आता २१०० रुपयांची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २० दिवस, eKYC न करणाऱ्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार नाहीत? अधिवेशनात काय चर्चा झाली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com