Krushi Utpanna Bazar Samiti News: 7 बाजार समित्यांच्या सभापती पदाची आज निवड; पदावर कोण होणार विराजमान

दुपारपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सभापती, उपसभापतींची नावे जाहीर होतील.
Krushi Utpanna Bazar Samiti News
Krushi Utpanna Bazar Samiti NewsSaam TV

Krushi Utpanna Bazar Samiti News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, कन्नड, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन या 7 बाजार समित्यांच्या सभापतीपदाची आज निवड होणार आहे. सकाळी ११ वाजता निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. दुपारपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सभापती, उपसभापतींची नावे जाहीर होतील.(Latest Marathi News)

आजच्या निवडणुकीसाठी सहलीवर गेलेले संचालक सदस्य परतीच्या मार्गावर आहेत. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या बाजार समितीची निवडणूक गेल्या महिन्यात २८ व ३० एप्रिल पार पडल्या. राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंद गटाने) विजय मिळवत बाजार समित्यांवर आपले वर्चस्व कायम ठेवले. असे असले तरी यावेळी सभापती पदासाठी सर्वच बाजार समितीमधून इच्छुकांची संख्या वाढली आहे.

Krushi Utpanna Bazar Samiti News
Political News: सुषमा अंधारे प्रकरणाचे मुंबईत पडसाद? ठाकरे गटाच्या नियोजित बैठकांना ब्रेक

ही वाढलेली संख्या भाजप- शिंदे गटाची डोकेदुखी ठरत आहेत. यात काहीजण फोडाफोडी करतील याची अनेकांना भीती आहे. त्यामुळे काहींची समजूत काढण्यात येत आहे. काही ठिकाणी पक्षातील वरिष्ठांना यश मिळाले आहे. तसेच काहीजण सहलीवर गेले आहेत. ते निवडणुकीच्या अनुषंगाने परतीच्या मागांवर लागले असून रात्री उशिरापर्यंत शहरात दाखल होणार आहेत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना शिंदे गटावर सभापतिपदासाठी स्पर्धा लागली आहे. यामुळे यात भाजप सावध भूमिका घेताना दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समिती व फुलंब्री, गंगापूर आणि लासूर येथे भाजपचा सभापती, तर पैठण, कन्नड, वैजापूर येथे शिंद गटाचा सभापती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Krushi Utpanna Bazar Samiti News
Political Update | आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणारा 12 वी फेल, तिहार जेल रिटर्न!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com