आसेगाव येथील कोल्हापुरी बंधारा फुटला

जिल्हा परिषदेने केलेल्या दुर्लक्षामुळे बंधारा फुटला असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.
आसेगाव येथील कोल्हापुरी बंधारा फुटला
आसेगाव येथील कोल्हापुरी बंधारा फुटलाराजेश काटकर
Published On

राजेश काटकर

परभणी - जिंतूर Jintur तालुक्यातील गारखेडा येथील वनविभागात असलेला पाझर तलाव व आसेगावातील नदीवर बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा अतिवृष्टीमुळे फुटला असून शेतकऱ्यांच्या Farmer जमिनी खरडून गेल्या आहेत. दरम्यान पहिल्या पावसात बंधारा फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त करून जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला दि.16 जूनला बंधारा दुरुस्त करण्याची मागणी केली होती परंतु जिल्हा परिषदेने केलेल्या दुर्लक्षामुळे बंधारा फुटला असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

संपूर्ण जिल्ह्यासह जिंतूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दमदार पाऊस पडत होता परिणामी गावातील ओढे नाले नदी यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे नदी नाल्यात पाणी साचल्यामुळे शेजारील शेतात पाणी शिरले. यामुळे जमिनी पाण्याबरोबर मातीसकट खरडून गेल्या आहेत. शिवाय पाझर तलाव व बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्यामुळे अति पाण्याच्या दाबामुळे तलाव बंधारे फुटले आहेत. यात गारखेडा येथील वनविभागात करण्यात आलेला पाझर तलाव अतिवृष्टीमुळे फुटला आहे. तलाव फुटल्यामुळे शेतजमिनीतून पाणी वाहून गेले त्यामुळे सर्व पिके खरडून गेली आहेत.

हे देखील पहा -

तर आसेगाव येथील गट न 486 मध्ये जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने 2017 मध्ये कोल्हापुरी बंधारा बांधकाम केले होते. बंधाऱ्यांची देखभाल ग्रामपंचायत कार्यालयाकडे सोपवण्यात आली होती. परंतु यावर्षी सुरुवातीला पाऊस कमी झाल्यामुळे बंधाऱ्याचे गेट उघडले नाही मात्र जून महिन्यात आसेगाव शिवारात अचानक दोरदार पाऊस झाला असून सुद्धा गेट उघडे नसल्यामुळे पाणी बंधाऱ्याच्या वरून न जाता बाजूने गेल्यामुळे नदीच्या काठावर भगदाड पडले व त्यातून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले.

आसेगाव येथील कोल्हापुरी बंधारा फुटला
पाहुणा म्हणून ताे घरात यायचा अन् माेबाईल चाेरुन न्यायचा

दरम्यान गावातील सरपंचांनी जिल्हा परिषदला पत्र देऊन बंधारा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र एक महिना उलटूनही काहीच कार्यवाही केली नसल्यामुळे  झालेल्या पावसाने बंधारा उध्वस्त झाला आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळेच शेतीचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी आरोप करत आहेत.

Edited By- Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com