Water Scheme
Water SchemeSaam Tv

Water Scheme: दूधगंगा नदीतून नवीन पाणी योजनेसाठी प्रयत्न सुरु, योजनेसाठी काठावरील गावांचा तीव्र विरोध

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीतून नवीन पाणी योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
Published on

कोल्हापूर: इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीतून नवीन पाणी योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रस्तावित योजनेला दुधगंगा नदी काठावरील 15 ते 20 गावांनी तीव्र विरोध करायला सुरुवात केलीये (Kolhapur villagers opposes new water scheme from Dudhganga river for Ichalkaranji).

Water Scheme
Kolahpur Polution Update : कोल्हापूर अडकलंय प्रदूषणाच्या विळख्यात; पाहा व्हिडीओ

या प्रकल्पासाठी कागल तालुक्यातील सुळकुड येथे दूधगंगा नदीवर (Dudhganga River) मोठा बंधारा बांधून पाणी अडविले जाणार आहे. त्याचा फटका सुळकूडसह काठावरील पंधरा ते वीस गावांना बसणार आहे. त्यामुळे या गावांनी आता एकत्र येत या इचलकरंजी (Ichalkaranji) पाणी योजनेविरोधात (Water Scheme) भूमिका घेतलीये.

याचाच एक भाग म्हणून नुकतच सुळकूड येथील नवीन पुलावर योजनेचा फटका बसणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत धरणे आंदोलन (Protest) केलं. यावेळी प्रसंगी जीवाची पर्वा न करता या योजनेविरोधात उभे राहू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीये. इतकंच नाही तर या योजनेसाठी सर्वे करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना रोखण्याच्या इशारा देखील या आंदोलकांनी दिलाय.

एकूणच या नव्या प्रस्तावित पाणी योजनेला सुळकुड सहन या गावातील लोकांनी रस्त्यावर उतरुन विरोध करायला सुरुवात केल्याने येत्या काळात जिल्ह्यात यावरुन वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com