Kolhapur : ऊस उत्पादकांची १३५ कोटीची एफआरपी थकीत; व्याजासह रक्कम देण्याची स्वाभिमानी संघटनेची मागणी

Kolhapur News : राज्य सरकारकडून साखर कारखानदार उस उत्पादक शेतकऱ्यांना दोन किंवा तीन टप्यात एफआरपी अदा करत होते. यामुळे एक- एक वर्षापर्यंत शेतकऱ्यांना रिकव्हरीनुसार मिळणारी हक्काची एफआरपी मिळत नव्हती
Kolhapur News
Kolhapur NewsSaam tv
Published On

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १३५ कोटी रूपयाची थकीत एफआरपी व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या १५ दिवसात जमा करावी. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये राजरोसपणे सुरू असलेले बोगस व लिंकींग खताची विक्री करणाऱ्या कंपन्यावर कडक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली.

राज्य सरकारकडून बेकायदेशीर कायदा करून साखर कारखानदार उस उत्पादक शेतकऱ्यांना दोन किंवा तीन टप्यात एफआरपी अदा करत होते. यामुळे उस कापणीनंतर एक- एक वर्षापर्यंत शेतकऱ्यांना त्यांची रिकव्हरीनुसार मिळणारी हक्काची एफआरपी मिळत नव्हती. याचा गैरफायदा घेऊन कोल्हापूर विभागातील कारखानदारांनी जवळपास १३५ कोटी रूपायाची एफआरपी थकीत ठेवली आहे. हि थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Kolhapur News
Nashik : आई घरकामात व्यस्त, अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचा आवाज अचानक बंद, बाहेर येऊन बघताच अनर्थ; नाशकात हळहळ

थेट कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

तर कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये युरीया व इतर खतांची टंचाई भासवून लिंकींग केले जात आहे. जिल्ह्यातील खत विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेते दुकानदार यांचेवर कारवाई करण्याचा फार्स विभागाकडून केला जातो. बोगस खत विक्री व लिंकींगमध्ये कृषी विभागातील अधिकारी व संबधित कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने संबधित खत कंपनीवर कारवाई करण्याऐवजी स्थानिक दुकानदारांवर कारवाई केली जाते. यापुढे संबधित दुकानात बोगस खत व लिंकींगची खत विक्री सापडल्यास संबधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानीने केली. 

Kolhapur News
Pachora Crime : घराबाहेर बसून टवाळक्या करणाऱ्यांना वृद्धेने हटकले; रात्री घरात घुसून केले भयानक कृत्य, तिघेही पोलिसांच्या ताब्यात

पालकमंत्रांकडून आश्वासन 

दरम्यान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कारखान्यांनी थकीत एफआरपी न दिल्यास आर. आर. सी. ची कारवाई करण्यास भाग पाडू. तसेच बोगस व लिंकींग खत कंपन्याविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांना सुचना देवून फिरते पथकाच्या धाडी टाकण्याचे आदेश दिले. तसेच ज्या कंपन्या लिकींगची सक्ती करतील; त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com