Kolhapur News: करूळ घाटात रस्ता खचला; कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे करुळ घाटातील रस्ता खचला आहे. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam Tv

कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे (Rain) करुळ घाटातील रस्ता खचला आहे. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. भुईबावडा घाटतून वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) आता पुन्हा सुरूवात केली आहे. मुंबईत पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभान वर्तवली आहे. पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

रत्नागिरी-चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Kolhapur News
Maharashtra Rain Update: मुंबईत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

मुसळधार पावसामुळे (Rain) रात्री उशीरा करुळ घाटातील रस्ता खचला आहे. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. भुईबावडा घाटतून वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोकणातून कोल्हापूरमध्ये येणाऱ्यांसाठी वाहतूकसेवा विस्कळीत झाली आहे. कोकणातून कोल्हापूरमध्ये मार्केटयार्ड तसेच हॉस्पीटलसाठी रोज नागरिक ये-जा करत असतात.

Kolhapur News
सर्व राजकीय पक्षांकडून मला फटके बसले, छत्रपती संभाजीराजे यांचं मोठं विधान, म्हणाले...

मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा (Rain) राज्यात जोर वाढणार आहे. मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मराठवाड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com