ED Raid: मोठी बातमी! हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ? ९ तास चौकशीनंतर ईडीने बजावले समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापा मारला होता...
Ed Raid On Hasan Mushrif Home
Ed Raid On Hasan Mushrif HomeSaamtv
Published On

Hasan Mushrif: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापा मारला होता. आज सकाळीच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले होते. तब्बल सात तास चौकशी केल्यानंतर इडीचे अधिकारी त्यांच्या घराबाहेर पडले.

या चौकशीनंतर आता महत्वाची माहिती समोर येत असून ईडीने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावले असून त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (Latest Marathi News)

Ed Raid On Hasan Mushrif Home
Mumbai News : सहायक पोलीस आयुक्तांचा ऑफिसमध्येच मृत्यू, जेवणानंतर विश्रांती घेत असताना दुर्दैवी घटना

याबाबत अधिक माहिती अशी की, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी आज ( ११ मार्च ) ईडीने पहाटे धाड टाकली. ईडीचे सात ते आठ अधिकारी पथकासह मुश्रीफांच्या घरी कागदपत्रांची तपासणी करत होते. हसन मुश्रीफ यांच्या घरी तब्बल सहा तास ईडीचे अधिकारी ठाण मांडून बसले होते. आबिद हसन मुश्रीफ आणि सायरा हसन मुश्रीफ यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तब्बल सात तास चौकशी झाली.

 गेल्या दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा ही धाड टाकली होती. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Ed Raid On Hasan Mushrif Home
Swati Maliwal : बापानं माझं लैंगिक शोषण केलं, भीतीनं पलंगाखाली लपायचे; स्वाती मालिवाल यांच्या दाव्यानं खळबळ

ईडीने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. “समाजासाठी हसन मुश्रीफ एवढं काम करत आहेत. पण, असे असलं तरी ईडीकडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात. एकदाच आम्हाला गोळ्या घालून मारून टाका,” अशी संतप्त प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

तसेच धाडीची माहिती मिळताच हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर मोठी गर्दी केली केली होती. यावेळी ईडी आणि किरिट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com