kolhapur News: आदित्य ठाकरेंची माणुसकी! अपघातग्रस्त तरुणांच्या मदतीला धावले युवा सेना प्रमुख

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे हे दौऱ्यावरून परत होते. कोल्हापूरकडून मुंबईकडे प्रवास करत होते. त्यांचा ताफा हा सातारा महामार्गावर असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. ही बाब आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील लोकांना समजली त्यावेळी आदित्य ठाकरेंनी आपला ताफा थांबवला.
Aditya Thackeray
Aditya Thackeraysaam Tv

(गिरीश कांबळे)

Aditya Thackeray Help To Biker :

सातारा महामार्गांवर अपघात झालेल्या दुचाकीस्वराच्या मदतीला आदित्य ठाकरे धावले आहेत. आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावरून परत होते, त्याचा ताफा सातारा महामार्गांवर असताना दुचाकीस्वराचा अपघात झाला. त्यावेळी आपला ताफा थांबवून आदित्य ठाकरे अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला धावले. यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या आदित्य ठाकरे यांचा संवेदनशील स्वभाव दिसून आला. (Latest News)

आदित्य ठाकरे हे दौऱ्यावरून परत होते. कोल्हापूरकडून मुंबईकडे प्रवास करत होते. त्यांचा ताफा हा सातारा महामार्गावर असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. ही बाब आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील लोकांना समजली त्यावेळी आदित्य ठाकरेंनी आपला ताफा थांबवला आणि त्या दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले. यावेळी आदित्य ठाकरेंनी अपघातग्रस्त झालेल्या युवकाची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांना फोन केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने या युवक किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान आदित्य ठाकरेंनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देत शिवसैनिकांच्या आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमी युवकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोन दुचाकीची धडक झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. अपघातग्रस्त युवकाला मदत केल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कृतीतून माणुसकीची दर्शन घडले.

आदित्य ठाकरेंची सरकारवर हल्लाबोल

दरम्यान आज शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि नार्वेकरांवर टीका केलीय. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. २०२४ मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली, खोक्यांचे राजकारण झालं. अशाचप्रकारे त्यांना वाचवलं जाणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान आणायच असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल केला. अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते? लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com