Kolhapur Basket Bridge : पुढच्या 50 वर्षात रस्त्यावर खड्डा पडणार नाही; नितीन गडकरींनी दिली हमी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बास्केट ब्रिज भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बास्केट ब्रिजच्या रस्त्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
Ntin Gadakari Latest News
Ntin Gadakari Latest NewsSaam Tv

रणजीत माजगांवकर

Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बास्केट ब्रिज भूमिपूजनाच्या कार्यक्रमात होणाऱ्या ब्रिजच्या रस्त्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ' कितीही मोठा पूर आला तरी पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबणार नाही. सांगली-कोल्हापुरात सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधू.पुढचे ५० वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची हमी देतो, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. (Latest Marathi News)

Ntin Gadakari Latest News
BBC Documentary In TISS : 200 विद्यार्थ्यांनी वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्री पाहिली; 'पीएसएफ' विद्यार्थी संघटनेने केला दावा

गेली अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात महापरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच महापुराचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गावर येत असल्यामुळे अनेक दिवस या परिसरातील वाहतूकही ठप्प होत असते. यासाठी सातारा ते निपाणी या दरम्यान सहा पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील (Kolhapur) पंचगंगा नदी पुलावरून थेट कोल्हापूरपर्यंत बास्केट ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. याची पायाभरणी तसेच रत्नागिरी कोल्हापूर राज्य मार्ग चौपदरीकरण टप्पा 2 , रत्नागिरी कोल्हापूर चौपदरीकरण टप्पा 3 याचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.

या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले, 'पुण्यासाठी लवकरत रिंग रोड बांधणार आहे. नागपूर ते कोल्हापूर सात तासात अंतर पार होईल अशी व्यवस्था करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात टेक्नॉलॉजीच्या आधारावर नवीन उद्योग झाले पाहिजेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना ऊर्जा दाता बनवलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यानेच पुढाकार घेतला पाहिजे'.

Ntin Gadakari Latest News
Government Employee : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; केंद्र सरकारने पेन्शन आणि ग्रॅच्युईटीबाबत घेतला मोठा निर्णय

'बंगळुरूमध्ये हवेत उडणारी डबल डेकर प्रकल्पावर आमचं काम सुरू आहे. या देशात क्षमता आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर राबवण्यात आलेल्या चुकीच्या धोरणामुळे धनवान असलेल्या देशात लोक गरीब राहिलेत, असे नितीन गडकरी पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com