Maharashtra Politics: हिशेब तर द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचं सूचक ट्विट; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam TV
Published On

सचिन कदम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या परिवाराच्या कथित 19 बंगलो घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल गुरुवारी रात्री सात जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Kirit Somaiya News )

तत्कालीन ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर, प्रशांत मिसाळ तत्कालीन ग्रामपंचायतीचे सदस्यांनी वेळोवेळी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कर आकारणी प्रक्रियेचा जाणीवपूर्वक अंमल केला नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंदीमध्ये बेकायदेशीर नोंदी घेऊन खोटे दस्तऐवज तयार केले व शासनाची फसवणूक केली असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

Maharashtra Politics
Kirit Somaiya LIVE | याकूब मेनन प्रकरणावर पाहा काय म्हणाले किरीट सोमय्या!; पाहा व्हिडीओ

एफआयआर क्रमांक 26 नुसार, आयपीसी कलम 420, 465, 466, 468 आणि 34 प्रमाणे मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी श्रीमती संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे या प्रकरणी पाठपुरावा करत आहेत.

Maharashtra Politics
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप?

उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे असलेल्या १९ बंगल्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी या बाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या या प्रकरणाचा पाठवुरावा करत होते. अशात आता गुन्हा दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना हिशोब द्यावा लागेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com