'मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले; धनंजय मुंडे तुम किस खेत की मूली ?'

'धनंजय मुंडेंनी जगमित्र शुगर च्या नावाने शेतकरी, भागधारकांच्या नावाने 83 कोटी ढापले; पूसमधील देवस्थान जमीनीमध्ये गैरव्यवहार करत मयत व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्री केल्या.'
'मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले; धनंजय मुंडे तुम किस खेत की मूली ?'
'मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले; धनंजय मुंडे तुम किस खेत की मूली ?' SaamTV
Published On

बीड : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज धनंजय मुंडेंच्या जगमित्र शुगर मिल्स (Jagmitra Sugar Mills) जागेची पाहणी केली. शिवाय ज्यांच्या जमिनी कारखान्याच्या जागेसाठी गेल्या त्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरती अनेक गंभीर आरोप करत टीकाही केली. ते म्हणाले, 'धनंजय मुंडेंच्या गुंडांनी मिरची ची धमकी दिली, मी या माफियाबाज सरकारचे घोटाळे समोर काढले म्हणून अनेक ठिकाणी मला हल्ल्याची धमकी दिली असल्याचं सोमय्या म्हणाले.

हे देखील पहा -

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले -

तसंच 'मी घोटाळे काढले तर त्यांना मिरची लागली, तर मी काय करू; मिरच्या कुठे झोंबणार ते त्यांना कळेल, हे महाराष्ट्रातील जनतेला लुटत आहेत शेतकऱ्यांचं रक्त पित आहेत. पण मी धमकीला घाबरत नाही; 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे घोटाळे बाहेर काढले; धनंजय मुंडे तुम किस खेत की मूली...? असा इशाराच त्यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) यावेळी दिला.

दरम्यान अजित पवारांसह शरद पवारांवरती (Ajit Pawar, Sharad Pawar) आरोप केले ते म्हणाले, 'पवारसाहेब किती रडण्याचे नाटक केले तरी महाराष्ट्राचे पैसे परत दिल्याशिवाय शांत बसणार नाही. धनंजय मुंडे यांनी जगमित्र शुगरच्या नावाने शेतकरी भागधारकांच्या नावाने 83 कोटी ढापले; पूसमधील देवस्थान जमीनीमध्ये गैरव्यवहार करत मयत व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्री केल्याचा आरोपही त्यांनी य़ावेळी केला.

'मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले; धनंजय मुंडे तुम किस खेत की मूली ?'
Breaking: मोठी बातमी; बैलगाड शर्यतीस सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी!

तसंच जगमित्र कारखान्याची चौकशी होणार आहे त्याबाबत ईडीकडे (ED) अर्ज केला असल्य़ाचं त्यांनी संगितलं तसच जर काही केलं नसेल तर घाबरता कशाला? चौकशीला समोर या असं आव्हानच सोमय्या यांनी मुंढेंना यावेळी दिलं. तसंच किरीट सोमय्या बर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com