ईडीची छापेमारी मोठं षडयंत्र; हसन मुश्रीफांनी शेअर केली किरीट सोमय्याची कथित ऑडिओ क्लिप

दिल्लीवाल्यांनी आपली कमिटमेंट पूर्ण केल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं गेलंय
Hasan Mushrif
Hasan MushrifSaam TV
Published On

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापेमारी केली. यावरुन राजकारण तापलेलं असताना आता हसन मुश्रीफांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हसन मुर्श्रीफ यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच आपल्यावरील ईडीची छापेमारी षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे.

कथित ऑडिओ क्लिप किरीट सोमय्यांची असल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. दिल्लीवाल्यांनी आपली कमिटमेंट पूर्ण केल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं गेलंय.

Hasan Mushrif
Election 2023: नाशिकनंतर नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीत ट्विस्ट; मविआच्या बैठकीनंतर मोठ्या निर्णयाची शक्यता

षडयंत्राचा हा घ्या पुरावा असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. घरावर रेड सुरू असतानाच किरीट सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी कमिटमेंट पूर्ण केली. यावरुन हे किती मोठे षडयंत्र आहे. याचा हा पुरावा असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.

मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर 11 जानेवारी रोजी छापे टाकण्यात आले होते. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती आहे.

Hasan Mushrif
Sudhir Tambe : काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

किरीट सोमय्या आज कोल्हापुरात

भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत किरीट सोमय्या यांचे स्वागत केले. हसन मुश्रीफ यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कारवाईमध्ये जाती धर्माचे राजकारण करू नये असंही सोमय्या यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com