यवतमाळच्या शिकाऊ डॉक्टर हत्याकांडाचा उलगडा; तिघांना अटक, 1 अल्पवयीन

ऋषीकेश साळवे प्रवीण गुंडजवार राहणार यवतमाळ व एक अल्पवयीन मुलगा असे तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
यवतमाळच्या शिकाऊ डॉक्टर हत्याकांडाचा उलगडा; तिघांना अटक, 1 अल्पवयीन
यवतमाळच्या शिकाऊ डॉक्टर हत्याकांडाचा उलगडा; तिघांना अटक, 1 अल्पवयीनSaam TV
Published On

संजय राठोड

यवतमाळ- अखेर शिकाऊ डॉ. अशोक पाल हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. 3 जणांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून डॉक्टरची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशोक पाल हा ग्रंथालयातून वस्तीगृहकडे जात असताना त्याला दुचाकीवरून जात असलेल्या काही तरुणांचा गतिरोधकावर धक्का लागला यातून झालेल्या वादातून अशोकवर दुचाकी स्वारानी चाकूने वार केले यात त्याचा मृत्यू झाला. यात पोलिसांचे एकूण 7 पथके काम करीत होती. 100 माहितीगारांची टीम तपासात काम करत होती. पारंपरिक व तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपींचा शोध लावला आहे. ऋषीकेश साळवे प्रवीण गुंडजवार राहणार यवतमाळ व एक अल्पवयीन मुलगा असे तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

यवतमाळच्या शिकाऊ डॉक्टर हत्याकांडाचा उलगडा; तिघांना अटक, 1 अल्पवयीन
बीड बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश; पाहा Video

दरम्यान, यवतमाळ शहरात नवरात्रीत दि. १२ ऑक्टोबरच्या रात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. त्याची शाई वाळत नाही तर पुन्हा येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील एका डॉक्टराचा शुल्लक कारणावरून दोघांनी चाकुने वार करून खुन केल्याची धक्कादायक घटना घडली. डाॅ.अशोक पाल असे मृत डाॅक्टरांचे नाव आहेत.

यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. अशोक पाल एमबीबीएसमध्ये तृतीय वर्षात कार्यरत होता. शेवटचे त्याचे तीन महिने उरले होते. मृतक हा ठाणे (मुंबई) येथील रहवाशी होता. बुधवारी रात्री वैधकिय महाविद्यालय येथील परिसरातून डॉक्टर अशोक पाल जात असताना संशयित मारेकऱ्यांनी त्यांना वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील नागरिकांसह डॉक्टरांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत डाॅक्टर पालला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टर पालचा मृत्यू झाला.

डाॅक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शिकाऊ डाॅक्टरांनी डीन, जिल्हा अधिकारी आणि एसपी विरोधात तीव्र रोष व्यक्त करित घोषणा बाजी केली. गुरूवारी सकाळ पासून शासकीय महाविद्यालयातील सर्व दरवाजे बंद करून काम बंद आंदोलन सुरू केल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. परिविक्षाधीन डॉक्टरांनी आक्रमक पाऊल उचलत डीन साहेब मुर्दाबाद, पोलिस प्रशासन मुर्दाबाद नारेबाजी करीत रुग्णालय परिसर दणाणून सोडला. डॉक्टर पाल यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करीत कठोर शिक्षा करा, या मागणीसाठी रुग्णालय परिसरात देखील आदोलन करण्यात आले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com