'केतकी'च्या अडचणी संपेनात; अ‍ॅट्रोसिटी प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी

Ketaki Chitale Atrocity Case : केतकीवर गुन्हा दाखल झालेल्या अ‍ॅट्रोसिटी प्रकरणाची सुनावणी आज ठाणे सत्र न्यायालयात पार पडली
Ketaki Chitale Case
Ketaki Chitale CaseSaam Tv

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेच्या (Ketaki Chital) अडचणी आणखीच वाढल्या आहेत. आधीच पोलीस कोठडीत असलेल्या केतकीला आता आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीवर गुन्हा दाखल झालेल्या अ‍ॅट्रोसिटी प्रकरणाची सुनावणी आज ठाणे सत्र न्यायालयात पार पडली. न्यायालयाने या सुनावणीत केतकीला 24 तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Ketaki Chitale 5 Days Police Custody In Atrocity Case)

Ketaki Chitale Case
राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात होणार शस्त्रक्रिया

काय आहे अ‍ॅट्रोसिटी प्रकरण?

केतकी चितळे हिने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क, आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो". अशी पोस्ट केतकीने केली आहे. याच प्रकरणात तिच्यावर तेव्हा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

केतकी चितळेवर फक्त ठाणे नवी मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गुन्हे दाखल झाल्याने आता इतर ठिकाणचे पोलीसही केतकीचा ताबा मागताहेत. गोरेगाव पोलिसांकडूनही केतकीचा ताबा घेण्यासाठी सचोटिने प्रयत्न सुरू होते. शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट ते आता अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात पोलिसांकडे ताबा यामुळे केतकी प्रकरण आता वेगळ वळण घेताना दिसून येत आहेत. केतकी चितळेचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. मात्र, या अहवालातील नेमका तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com