Video Song : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय...' मीम्सनंतर आता गाणंही आलं!

Kay zadi kay dongar Viral Video Song : मराठी यूट्यूबर शंतनू पोळे (Shantanu Pole) या तरुणानं शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगला संगीत देत हे गाणं तयार केलं आहे.
kay zadi kay dongar Song By Shantanu Pole
kay zadi kay dongar Song By Shantanu PoleSaam Tv

मुंबई: 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय..' हा डायलॉग (kay zadi kay dongar Viral Video Song) सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या फोनकॉल रेकॉर्डिंगमधलं हे वाक्यं आता अजरामर झालंय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर जे शिवसेनेचे ४७ आमदार शिंदेंसोबत केले त्यात एक नाव म्हणजे शहाजीबापू पाटील. त्याच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याच्या 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय..' या डायलॉगवर आता चक्क गाणंही बनवलं गेलं आहे. मराठी यूट्यूबर शंतनू पोळे (Shantanu Pole) या तरुणानं शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगला संगीत देत हे गाणं तयार केलं आहे. हे गाणंही आता सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होतंय. (Shahajibapu Patil Memes, Songs And Latest News)

हे देखील पाहा -

शंतनू पोळे या तरुणानं हे गंमतीशीर गाणं बनवलं आहे. सोशल मीडियारील ट्रेंडवर गाणं बनवणाऱ्या यशराज मुखाटे (Yashraj Mukhate)यांच्याकडून प्रेरणा घेत हे गाणं बनवल्याचं शंतनू पोळे याने आपल्या इंन्स्टाग्रान पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच "या राजकारण्यांच राजकारण तर चालत राहील, आपण आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा, हाय का नाय!" असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांना हा फोनकॉल व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्यावर मीम्स बनवले जात आहे, यावर टी-शर्टही बनवले जात आहेत त्यामुळे शहाजीबापू पाटील हे सध्या राज्यात चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत.

शहाजीबापू पाटील कोण आहेत?

शहाजीबापू पाटील हे सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. १९८५ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले. १९९५ मध्ये शहाजी बापू पाटील अवघ्या १९२ मतांनी निवडून आले. गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या सलग चार विधानसभा निवडणुकांमध्ये शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीटही मिळालं आणि अखेल चार पराभव पाहिल्यानंतर शहाजीबापू पाटील हे विजयी झाले. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत अवघ्या ७६८ मतांनी ते विधानसभेत पोहोचले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com