पंढरपूर - आज कार्तिकी एकादशी आहे. कार्तीकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते आज पहाटे संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी होण्याचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना मिळाला आहे. शासकीय सेवेतून सेवेतून निवृत झालेले साळुंखे कुटुंबं गेली 50 वर्ष कार्तीकी वारी करत आहेत. यावेळी सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.
महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सामान्य वरांच्या सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्तीकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर सावळ्या विठुरायाचे दर्शन भाविकांना सुरु करण्यात आले आहे. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाला पिवळ्या रंगाचा पितांबर, शेला आणि अंगी असा पोशाख करण्यात आलाय. तसेच सोन्याचा मुकुट देखील डोक्यावर ठेवण्यात आलाय.
कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे. चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. पंढरपुरात हरी नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.
पंढरपूर ते घुमान सायकल वारीचा शुभारंभ...
संत नामदेव महाराज जयंती निमित्त पंढरपूर ते घुमान (पंजाब )सायकल वारीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या सायकल दिंडी मध्ये 110 सायकलस्वारांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात ,राजस्थान पंजाब, हरियाणा या राज्यातून ही सायकल दिंडी जाणार आहे. सलग 22 दिवसाची ही वारी घुमानमध्ये पोहोचल्यानंतर पंजाबचे राज्यपाल या वारकऱ्यांचे स्वागत करणार आहेत.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.