Kalyan News: आमचे मशाल चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे; सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा समता पार्टीचा इशारा

आमचे मशाल चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे; सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा समता पार्टीचा इशारा
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

कल्‍याण : शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय. त्यातच ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केल्यानंतर ठाकरे यांच्या अडचणीत वाढत झाली आहे. मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी सांगितले. (Tajya Batmya)

मशाल चिन्हावरून झालेल्या निर्माण झालेल्या या वादामुळे ठाकरे यांचे समोरील आव्हान वाढले असल्याचे दिसून येत आहे. कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिला. याबाबत बोलताना उदय मंडल यांनी धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

Kalyan News
Jalgaon News: मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

सुप्रीम कोर्टात धाव घेणार

शिवसेनेचा (Shiv Sena) जो काही अंतर्गत वाद होता; तो आता निकालात निघाला. चिन्ह व पक्षाचे नाव हे शिंदे गटाला मिळाले. त्यामुळे आमचं चिन्ह का अडकवून ठेवलय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमचं चिन्ह इतर कोणत्या पक्षाला देऊ नका. आमचं चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे. यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचा अंतर्गत वाद सुरू असताना २०२२ मध्‍ये आम्हाला हे चिन्ह मिळाले होते.

शिवसेनेच्‍या वादाशी देणे घेणे नाही

समता पार्टी ही बिहारमधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का? त्यांनी जाणून-बुजून असं केलं का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. उदय मंडल यांनी आम्ही धनुष्यबाण व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांना जरी मिळाला असता तरी त्यांचे देखील अभिनंदन केलं असते. आम्हाला शिवसेनेच्या अंतर्गत वादाशी काही देणंघेणं नाही. आम्हाला आमचं मशाल हे चिन्ह हवंय त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले.

आरोप करण्यापलीकडे राऊतांकडे काहीच उरलं नाही

काही जणांना मुख्यमंत्री पुढे करतात. या आरोपाला उत्तर देताना उदय मंडल यांनी संजय राऊत यांच्या जवळ तर काही सोडलं नाही. खोके देखील नाही असा मिश्किल टोला लगावला. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे खुर्ची एकनाथ शिंदे घेऊन गेले पार्टी घेऊन गेले. चिन्ह देखील घेऊन गेले तरी हे पाहत राहिले. यांच्याकडे काही उरल नाही; तर दुसऱ्याकडे बोटं दाखवतात समता पार्टीकडे बोटं दाखवतात त्यांच्याकडे काहीच उरलं नाही असा टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com