KDMC News: केडीएमसीच्या कारवाईला नागरिकांचा विरोध; अधिकाऱ्यांना घेराव घालत घोषणाबाजी

केडीएमसीच्या कारवाईला नागरिकांचा विरोध; अधिकाऱ्यांना घेराव घालत घोषणाबाजी
KDMC News
KDMC NewsSaam tv

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण पुर्वेकडे कोळशेवाडी परिसरात आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथकाने १७ ते १८ टपऱ्यावर कारवाई सुरू केली. मात्र या (Kalyan News) जागेप्रकरणी न्यायालयात केस सुरू आहे. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. केडीएमसीच्या (KDMC) अधिकाऱ्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Breaking Marathi News)

KDMC News
Jalgaon News: शालकाला फोन करत रेल्‍वेखाली मारली उडी; शेतीच्‍या वाटणीवरून भावांमध्‍ये होता वाद

कल्याण पुर्वेकडील कोळशेवाडी परिसरात लेखक जागेवर सतरा ते अठरा टपऱ्यात गेला अनेक वर्षांपासून आहेत. मात्र ही जागा खाजगी मालकीची असल्याचा दावा आता करण्यात आला. आज महापालिकेचे पथक या टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले. या कारवाईला टपरी चालकांनी जोरदार विरोध केला. कारवाई अन्यायकारक व बेकादेशीर असल्याचे सांगत कारवाई करण्यास गेलेल्या सहाय्यक आयुक्त यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

KDMC News
Dombivali News: अनधिकृत वीज जोडणी; कारवाई करायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर दगडफेक करत मारहाण

टपरी चालक संतप्‍त

गेले पस्तीस वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. या जागेचे भोई भाडे देखील आम्ही देत आहोत. आमच्याकडे पावती आहे, जागेसंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. ही कारवाई अन्यायकारक, बेकायदेशीर आहे; असा आरोप या टपरी चालकांनी केला. नागरिकांचा वाढता विरोध पाहता केडीएम्सीच्या पथकाने तेथून काढता पाय घेतला. तर याबाबत सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी या प्रश्नबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असून आयुक्तांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com