Kalyan News: भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या कार्यालयावर दगडफेक झालीच नाही; पोलिस तपासात समोर आलं वेगळंच कारण

Kalyan News: कल्याण मधील भाजप पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना उजेडात आली आणि एकच खळबळ उडाली.
Kalyan News
Kalyan NewsSaam TV

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Kalyan News: कल्याण मधील भाजप पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना उजेडात आली आणि एकच खळबळ उडाली. घटनेचा सीसीटीव्ही समोर आला दगड फेकून काही जण पळताना दिसले. या घटनेमुळे घाबरलेल्या भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार केली आणि पोलीस तपास सुरू झाला. मात्र या तपासात समोर आलेल्या घटनेनंतर पोलीसांसह भाजप पदाधिकाऱ्याने देखील डोक्याला हात लावला. (Breaking Marathi News)

Kalyan News
Women's Financial Support: महिलांसाठी गुड न्यूज, २७ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी मिळणार अर्थसहाय्य

या इमारती लगत असलेल्या आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे तोडण्यासाठी काही अल्पवयीन मुलांनी ही दगडं फेकली होती. मात्र यातील काही दगडे गाडीवर पडली. काच फुटल्याचे लक्षात येताच या मुलांनी तेथून पळ काढला. कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय आहे .

गुरूवारी (११ मे) दुपारच्या सुमारास अज्ञातानी संदीप सिंग यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीत कार्यालया बाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या काचा फुटल्याने गाडीचे नुकसान झालं. दगडफेक करून पळून जाणारे काही जन सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. या घटनेमुळे संदीप सिंग घाबरले होते. संदीप सिंग यांनी याबाबत महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली तक्रार नोंदवली.

या घटनेचा गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांचे पथक परिसरात दाखल झाले. सीसीटीव्ही च्या साह्याने काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता समोर आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला.

Kalyan News
Param Bir Singh Suspension: परमबीर सिंह यांचं निलंबन मागे का घेतलं? फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

या घटनेचा गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांचे पथक परिसरात दाखल झाले. सीसीटीव्ही च्या साह्याने काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता समोर आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला.

ही मुलं इमारतीत लगत असलेल्या आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे तोडण्यासाठी दगड मारत होते. दगड आंब्याला न लागता संदीप सिंग यांच्या कार्यालयाला तसेच कार्यालय बाहेर उभे असलेल्या गाडीला लागले. या घटनेत संदीप सिंग यांच्या गाडीची काच फुटली. हा खुलासा झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यानी देखील सुटकेचा श्वास सोडला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com