Kalyan KDMC News : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील काही भागात गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा गेला जातो. या पाणी पुरवठ्याचे केडीएमसीकडून एमआयडीसीला पावणे सहाशे कोटी रुपये बील येणे बाकी आहे. ही धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. ही थकबाकी २७ गावे ग्रामपंचायतीत असल्यापासून आहे.
त्याबरोबर केडीएमसीच्या आसपासच्या ग्रामपंचायतींनी सुद्धा एमआयडीसीचे पाण्याचे बिल थकवले आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे . केडीएमसी व संबंधित ग्रामपंचायत थोडाफार प्रमाणात बिल भरतात. मात्र कोट्यवधींची थकबाकी असून थकबाकी भरण्या संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले. (Latest Marathi News)
माहिती अधिकारात जागरुक नागरिक राजू नलावडे यांनी ही माहिती उघड केली आहे. नलावडे यांनी एमआयडीसी (Kalyan News) ज्या ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठा करते. त्यांच्याकडून पाणीबिलाचे किती पैसे येणे बाकी आहे? याची विचारणा केली होती.
दरम्यान, एमआयसीडीची पाणी बिलाची थकबाकी महापालिका भरत नसल्याने एमआयडीसी निवासी भागासह २७ गावातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे का? डोंबिवली निवासी भागाला गेल्या दोन महिन्यापासून पाणीच येत नाही. या थकबाकीमुळे आमचा पाणी पुरवठा रोखला जातोय का? असा सवाल नलावडे यांनी उपस्थित केला आहे. (Breaking Marathi News)
आमच्याकडून पाणी बिलाची रक्कम वसूल केली जाते. मात्र हा पैसा केडीएमसीकडून (KDMC) एमआयडीसीला दिला जात नसल्याने तो जातोय तरी कुठे? याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेने एमआयडीसीची थकीत रक्कम भरावी. जेणे करुन एमआयडीसीकडून आम्हाला नियमित पाणी पुरवठा केला जाईल अशी मागणी नलावडे यांनी केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका थकबाकी - 575,23,12,785 रुपये.
ग्रुपग्रामपंचायत मांगरूळ गोरपे गाव- 2,30,99,479 रुपये.
सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळ - 1,45,88,017रुपये.
ग्रामपंचायत नेवाळी काकडवाल -6,73,82,883.00 रुपये.
खोणी ग्रामपंचायत - 84,34,601.00 रुपये.
ग्रुप ग्रामपंचायत नेवाळी - 31,14,7830 रुपये.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.