Rasta Roko Andolan On Toll: आधी रस्ता करा, मगच टोल घ्या ! ग्रामस्थ आक्रमक
Sangli News : आधी रोड मग टोल (toll latest news) यासह विविध मागण्यांसाठी कडेगाव (kadegoan near sangli) शहरातील नागरिक हायवेवरील रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी घोषणाबाजी देत रास्ता राेकाे आंदाेलन सुरु केले आहे. (Maharashtra News)
सांगली जिल्ह्यातील कडेगाव ते ओगलेवाडी महामार्गमधील जाचक,स्पिड ब्रेकर यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. सुरली घाटाचे रस्त्याचे काम चार पदरी करणे आणि येणे व जाण्यासाठी वेग वेगळे मार्ग झाल्याशिवाय येवले वाडी येथे सुरू होणारा टोलनाका सुरू करू नये अशी मागणी गावक-यांची आहे.
आधी रोड मग टोल यासह विविध मागण्यांसाठी कडेगाव शहरातील नागरिक हायवेवर रस्त्यावर येत घोषणाबाजी करत आक्रमक झाले होते. यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी ऐस देशमुख, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, अभिमन्यू वरुडे, राजेंद्र राऊत, राहुल चन्ने, जीवन करकटे आकाश धर्में व पाणी संघर्ष समितीचे मान्यवर उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.