Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरण किती टक्के भरलं? संपूर्ण मराठवाड्याला दिलासा देणारी आकडेवारी

Jayakwadi Dam Today Water Storage : सप्टेंबर महिन्यातही पावसाची संततधार सुरु असल्याने जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.
Jayakwadi Dam Water Level Today
Jayakwadi Dam Water Level TodaySaam TV
Published On

मराठवाड्यातील नागरिकांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यातही पावसाची संततधार सुरु असल्याने जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Jayakwadi Dam Water Level Today
Pune District Dams : पुणे जिल्ह्यातील 26 पैकी‌ 12 धरणे काठोकाठ भरली, इतर धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा? वाचा...

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक तालुक्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं असून ओढे, नदी-नाले आता ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील मध्यम आणि छोटे प्रकल्प आता पूर्णतः भरलेली आहेत.सोबतच जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज मंगळवार सकाळी 90 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.

सध्या धरणात 11 हजार क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक वाढली आणि पाणीसाठा 95 टक्क्यांच्या पुढे गेला तर जायकवाडी धरणाचे (Jayakwadi Dam) काही दरवाजे उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजही पावसाची अंदाज आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालं असून काही ठिकाणी हलका पाऊसही झालाय.

त्यामुळे लवकरच जायकवाडी धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेत प्रशासनाने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा दिला आहे. दुसरीकडे सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, बाजरी, मका या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्याने पिके वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी पिके आडवी झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतीमध्ये पाणी थांबल्यामुळे पिक वाढतील की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे. सरकारने तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited by - Satish Daud

Jayakwadi Dam Water Level Today
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस; मराठवाडा विदर्भातील 'या' जिल्ह्यांना झोडपणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com