Jalna News
Jalna NewsSaam tv

Jalna News: गुरुजींसाठी चिमुकल्यांचे शाळेसमोरच आंदोलन

गुरुजींसाठी चिमुकल्यांचे शाळेसमोरच आंदोलन
Published on

जालना : जालना तालुक्यातील सोमनाथ येथे जि.प. शाळेत एकच शिक्षक आहे. मात्र दोन शिक्षक (Teacher) मिळावे; यासाठी चिमुकल्यांनी शाळेसमोरच आंदोलन सुरू केले आहे. आता शिक्षण विभाग या चिमुकळ्यांची मागणी पूर्ण करतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. (Letest Marathi News)

Jalna News
Nagpur News: पोलिसांनी तपासले १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज; घरफोडी करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश

जालना (Jalna) तालुक्यातील सोमनाथ येथे गुरुजींसाठी चिमुकल्यांनी शाळेसमोरच जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. सोमनाथ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत (ZP School) दोन शिक्षकाची नेमणूक असताना एकच शिक्षक असल्याने त्यांना पाच वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत असल्याने वर्षभराचा अभ्यासक्रमही पूर्ण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

तर शाळेला लागते कुलूप

एकच शिक्षक असल्याने त्यांना निवडणूक कार्यक्रम, शासनाच्या विविध कामानिमित्त व रजेवर जायचे असल्यास शाळेला चक्क कुलुप लावावे लागत असते. यामुळे हतबल झालेल्या मुलांनी आज चक्क शाळेच्या प्रांगणात दोन शिक्षक द्या; अशी जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com