Vinayak Raut: राज्यपालांच्या हकालपट्टीची पंतप्रधानांकडे मागणी; खासदार विनायक राऊत

राज्यपालांच्या हकालपट्टीची पंतप्रधानांकडे मागणी; खासदार विनायक राऊत
Vinayak Raut
Vinayak RautSaam tv

जालना : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सतत महापुरुषांचा अवमान करतात. त्यामुळे राज्यपालांनी माफी मागून जमणार नाही. राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे करीत आहोत; असे शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. (Live Marathi News)

Vinayak Raut
Dhule News: शिवाजी महाराजांच्या एकेरी वक्तव्याचे धुळ्यात पडसाद; राज्‍यपालांविरोधात घोषणाबाजी

खासदार राऊत (MP Vinayak Raut) यांच्या उपस्थितीत आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जालन्यात (Jalna) निषेध करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सुधांशुच्या माध्यमातून भाजप (BJP) शिवाजी महाराजांकडे कुत्सितपणाने पाहत आहे हे आता उघड झाले असल्‍याचेही ते म्हणाले.

आंबेडकर– ठाकरे एकत्र यावे

सुधांशुने शिवाजी महाराजांचा कोणता अभ्यास केला असा सवाल उपस्थित करत भारतीय जनता पक्षाने केलेले कृत्य क्षम्य नाही. असंही राऊत यावेळी म्हणाले. आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची काल भेट झाली असून आंबेडकर आणि ठाकरे एकत्र यावे; अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे देखील त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com