Dhule News: शिवाजी महाराजांच्या एकेरी वक्तव्याचे धुळ्यात पडसाद; राज्‍यपालांविरोधात घोषणाबाजी

शिवाजी महाराजांच्या एकेरी वक्तव्याचे धुळ्यात पडसाद; राज्‍यपालांविरोधात घोषणाबाजी
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी व भारतीय जनता पार्टीचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभर उमटत असून धुळ्यात (Dhule) देखील सखल मराठा समाजाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांची प्रतिमा जाळून निषेध करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

Dhule News
Sangli News: तोतया नौदल अधिकाऱ्याचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले. यानंतर भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वक्‍तव्‍य केले. दोन दिवसांपासून याचे पडसाद उमटत असून, निषेध व्‍यक्‍त केला जात आहे. त्‍यानुसार धुळ्यात (Dhule News) देखील निषेध आंदोलन झाले.

घोषणाबाजी करत प्रतिमेस जोडो मारो

सखल मराठा समाजाच्यावतीने केला जात असलेल्या या निषेध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी निषेधकर्त्यांतर्फे राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com